नागरिकांना पाणी नाही तर टॅक्स ची शक्ती कशाला ?

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 24/11/2021 6:19 PM

 

  अभिषेक कारेमोरे यांचे आव्हान

 पिण्याच्या पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची नगर परिषदेवर धडक  


 रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर:-- नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता नगर परिषदेने गत चार पाच दिवसापासून शहरातील पाणी पुरवठा खंडित केला आहे .सदर प्रकार महिन्यापोटी पोटी होत असतांना मात्र नगर परिषद नागरिकांकडून पाणीचा टॅक्स पूर्ण वसूल करत आहे हे अन्यायकारक असून आता या पुढे  नागरिकांना पाणी नाही तर टॅक्स ची शक्ती ही नाही अशी घोषणा देत   राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव तथा माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या नेतृत्वात २३ नोव्हेंबर रोजी    राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तुमसर नगर परिषदेच्या हलगर्जीपणा व नियोजनशुन्यता विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. 

 तुमसर शहराला 5 किलोमीटर अंतरावरील माडगी व कोष्टी घाटावरील वैनगंगा नदीतून पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा तुमसर शहराला केला जातो पाणी पुरवठा शहराला सुरळीत व्हावे म्हणून नगर परिषदेच्या मालकीचे एकूण 5 मोठे मोटार पंम्प आहेत त्यात माडगी येथिल पंम्प हाऊस मध्ये 2 तर कोष्टी येथे 3 मोटार पंम्प लागून आहेत एक जर नादुरुस्त झाला तर लगेच दुसरा पंम्प लावून पाणी पुरवठा करणे सहज शक्य होते मात्र न प च्या हलगर्जीपणा मुळे व ऐतखाऊ पना मुळे बिघडलेल्या

पंपाची दुरुस्ती कधी करत नाही परिणामी सर्वच मोटार पंम्प खराब झाल्यावर नगर परिषदेला उशिरा जाग येते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्या अभावी मनस्ताप सहन करावा लागतो हे नित्याचे झाले आहे. सदर समस्येची जाणीव करण्यासाठी नगर प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी नगर परिषदेवर येथिल नागरिकांसमवेत येथिल माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे यांच्या नेतृत्वात मोर्चाने धडक दिली. व नागरिकांनी पाणी टॅक्स का भरावा या बाबत विचारणा करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले  दरम्यान या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी उपमुख्यधिकारी साळूंके यांनी  पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दालनात बोलावून नागरिकांच्या पिण्याचे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासंबधी सुचना केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे ,शहराध्यक्ष राजेश देशमुख ,युवक अध्यक्ष सुनील थोटे ,सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष प्रदीप भरनेकर,सुमित मलेवार  विक्रम लांजेवार,सुदीप ठाकूर, अतुल सार्वे,मुकेश मलेवार,बंटी भुरे,अमित कुंजेकर ,अंकुर ठाकूर अतुल कनोजे,प्रतीक निखाडे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या