*तहसिल कार्यालयात सर्वसामान्य गोरगरीब जनतेची हेळसांड खपवून घेणार नाही?*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 25/10/2021 10:19 PM

सर्वसामान्य गोरगरीब रेशन कार्ड , शेत जमीन संदर्भातील समस्या तत्काळ सुटले पाहिजे
तहसील कार्यालयातील प्रशासन गतिमान करण्यासाठी कटिबद्ध
आमदार डॉ देवराव होळी
*दिनांक - 25 अक्तोंबर 2021 चामोर्शी*
*तहसिल कार्यालय चामोर्शी येथे*
*गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी*
*यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाला यावेळी तहसीलदार शिकतोडे भाजप तालुका* *अध्यक्ष दिलीप चलाख , भाजपा*
*बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ शहा , उपसरपंच शेषराव कोहळे युवा नेते राठी , जयराम चलाख व पदाधिकारी उपस्थित होते* *उपस्थितांना आमदार डॉ देवराव होळी यांनी निर्देश दिले व सर्वसामान्य गोरगरीब जनतेला विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे तहसिल कार्यालयात दप्तर दिरंगाई होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे,वृध्द  गोर गरीब जनतेला तहसिल कार्यालयात श्रावण बाळ योजना व विविध राज्य व केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी येरझारा मारावे लागत आहे , हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे परंतु आता तहसिल कार्यालयात सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा होत असलेला हेळसांड खपवून घेणार नाही असे प्रतिपादन आमदार डॉ देवराव होळी यांनी केले  *मंडळ स्तरावर तमाम तलाठी , मंडळ अधिकारी कर्मचारी यांनी सर्वांगीण विकासासाठी,व सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा सेवा करण्यासाठी कटिबद्ध होऊन काम करावे असे आवाहन आमदार डॉ देवराव होळी यांनी केले*

Share

Other News

ताज्या बातम्या