अ. अ. भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले झुडपांची छटाई आंदोलन

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 22/09/2021 7:52 PM




कोरची - आशिष अग्रवाल
                     गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगत असलेला आदिवासी बहुल तालुका कोरची. या तालुक्याच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांची निधी वर्षाला येत असून सदर निधीच्या तालुक्यात सदुपयोग होत आहे का? याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. कोरची हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे नेहमी वाहनांची वर्दळ असते व शहरातील फवारा चौक व  ग्रामीण रुग्णालय कडे जाणाऱ्या मार्गाच्या वळणावर मोठ मोठे झुडूप वाढल्यामुळे लोकांना मार्गक्रमण करायला खूप अडचण निर्माण होत होती व या झुडपामुळे अपघाताची शक्यता सुद्धा वाढली होती. काही दिवसापूर्वी फवारा चौकात एका व्यक्तीचे अपघाती निधन सुद्धा झाले आहे. परंतु याकडे संबंधित विभागाने दखल न घेतल्यामुळे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरची तर्फे 20 सप्टेंबरला तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते व 22 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला होता.
                    दखल न घेतल्यामुळे समिती तर्फे फवारा चौक व ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्याच्या वळणावर झुडुपांची छटाई करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरची चे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, शहर अध्यक्ष चेतन कराडे, श्‍याम यादव, अभिजीत निंबेकर, चंदू वालदे, भुमेश शेंडे, भूषण तेलासी, धम्मदीप लाडे, कृष्णा वंजारी, निखील साखरे, रवी बावणे, जयलाल सिंद्राम, पप्पू सिंन्हा, सुनील सयाम आदी उपस्थित होते. या आंदोलनात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Share

Other News

ताज्या बातम्या