अंढेरा येथे पोषण अभियानांतर्गत पोषण माह उत्साहात साजरा!

  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 22/09/2021 4:49 PM

ज्ञानेश्वर म्हस्के
अंढेरा/प्रतिनिधी
स्थानिक अंढेरा येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देऊळगाव राजा अंतर्गत १सप्टेंबर ते ३०सप्टेंबर या कालावधीत सुरू असलेला पोषण अभियानांतर्गत पोषण माह अंढेरा बीट मधील स्थानिक अंगणवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंढेरा गावाच्या सरपंच सौ.रुपाली आंबिलकर व सौ.सिंधुबाई तेजनकर ग्रामपंचायत सदस्या व सौ.कुशीवर्ता रामेश्वर जायभाये पर्यवेक्षिका अंढेरा बीट व सौ.विद्या हरिभाऊ जोशी देऊळगाव मही बीट हजर होत्या. यावेळी आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व सर्वांच्या वतीने हार अर्पण करण्यात आला.यावेळी दि.२२सप्टेबर २०२१ला पोषण महा अभियानांतर्गत पोषण आहार प्रदर्शन,रांगोळी प्रदर्शन,तसेच महिलांना पोषण आहार संदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यमध्ये अंढेरा बीट मधील स्थिनिक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषण आहाराचे भव्य व रांगोळीचे भव्य प्रदर्शन भरविले होते.यावेळी गरोदर माता व स्तनदा माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी त्यांना पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले.यावेळी रेखा तेजनकर,सौ.नंदा देशमुख,सौ.लिला डोईफोडे,रेणुका डोईफोडे,सौ.वंदना तेजनकर,सुनिता देशमुख,सौ.सविता राठोड,सौ.सरस्वती सानप ह्या अंगणवाडी सेविका हजर होत्या.तर मणकर्णा तेजनकर,सौ.नंदा तेजनकर,संगिता म्हस्के,सौ.निता तेजनकर,सौ.कविता तेजनकर सौ.शारदा वाघ ह्या मदतनीस हजर होत्या‌.सदर कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या