ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

स्नेहबंध केअर सेंटरचे कार्य प्रशंसणीय :- अँड . स्वाती शिदे


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/10/2021 10:16:39 AM


    सांगलीमध्ये चालविल्या जाणाऱ्या स्नेहबंध केअर सेंटरला आज एक वर्ष पूर्ण झाले. वृद्ध रुग्णांच्या सेवेचे कार्य करणार्‍या या सेंटरच्या वर्षपुर्तीनिमित्त आज BJP Mahila Morcha, Sangli - भाजपा महिला मोर्चा, सांगली जिल्हाध्यक्षा Adv. Swati Shinde - ॲड. स्वाती शिंदे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. समाजात अनेक ठिकाणी वृद्धाश्रम असतात परंतु वृद्धाश्रमांमध्ये परावलंबित्व झालेल्या आजारी रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. परंतु स्नेहाबंध सेंटरमध्ये परावलंबित्व हाच वृद्धांना दाखल करून घेण्याचा मुख्य निकष आहे. या सेंटरमध्ये कोणत्याही गटातील परावलंबी असलेल्या रुग्णांना आवश्यक  सेवा दिली जाते. रुग्णांची काळजी घेणे, त्यांची शुश्रुषा करणे, त्यांची सेवा करणे, समुपदेशन करणे याचबरोबर रुग्णांना ते आपले घर वाटेल अशा पद्धतीने वृद्ध रुग्णांवर उपचार करुन औषधोपचार, नर्सिंग केअर, जेवणाखाण्याची सर्व सोय या सेंटरमध्ये केली गेली आहे. सावली केअर सेंटर कोल्हापूर यांच्या  सहकाऱ्यांने हे सेंटर चालते. महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी सावली केअर सेंटरची केअर सेंटर आहेत. स्नेहबंध केअर सेंटटरच्या संचालिका सौ. नीना जोशी आणि पांडुरंग जोशी यांचा रुग्णसेवेच्या समाजकार्याला १ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल स्वातीताई शिंदे यांनी सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी सावलीचे संचालक किशोर देशपांडे, गौरी देशपांडे, डॉ. मौसमी कुंभोजकर उपस्थित होते.

स्थळ :- 'उत्कर्ष' बंगला, ३०३/१, प्लॉट नं. ३७, दत्त कॉलनी, सह्याद्रीनगर, विश्रामबाग, सांगली. 

फोन नं.: 0233 - 2673999

मोबाईल नं.: 9225822105, 9890985002

Share

Other News