मनपा क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/04/2021 11:45 AM


सांगली दि १५,

   सा.मि.कु. मनपा क्षेत्रातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्ताच्या उपाययोजना करणेबाबत मनपा मा.महापौर दिग्विजय सूर्यवंशीसाहेब यांची भेट घेऊन या समस्येबाबत त्यांच्याशी चर्चा केली व भूमिका मांडली मांडली यावेळी मनपा मा.महापौर दिग्विजय सूर्यवंशीसाहेब यांनी सकारात्मक भूमिका घेत मनपा आयुक्तांशी व प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढून  याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी तोहीद शेख, उदय ओंकार, मुनीर मुल्ला, नितीन पवार,अमर अळतेकर व इतर उपस्थित होते.

(मनपा क्षेत्रातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची समस्या ही फार गंभीर असून मनपा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाने वेळीच याबाबत सक्रिय सहभाग नोंदवावा ही विनंती.)

मागण्या खालीलप्रमाणे:-

1) मनपा प्रशासनाकडून मनपा क्षेत्रातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करणेसाठी  सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांसाठी डॉग पौंड केंद्र (Dog Pound Unite) करण्यात यावेत व  प्रशासनाकडून सदरचा प्रकल्प राबवण्यात यावा.

2) मनपा क्षेत्रातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचे रेबीज लसीकरणाचे प्रमाण तात्काळ वाढवण्यात यावे.

3) मनपा क्षेत्रातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचे ABC (नसबंदी) चे प्रमाण तात्काळ वाढवण्यात यावे.

4) मनपा क्षेत्रातील चिकन व मटण दुकानातील वेस्ट मांसाचा कचरा उठाव करणे, दुकानासमोर भटक्या व मोकाट कुत्र्यांना थांबू न देणे तसेच चिकन 65 च्या गाड्यांजवळ भटक्या व मोकाट कुत्र्यांना थांबू न देणे तसेच गाडीवाल्यांकडुन किंवा  ग्राहकांकडून कुत्र्यांना टाकण्यात येणारे मास/हाडे त्यांना न टाकता  गाड्यावरच त्यासाठी कचरा पेटीची सोय करणेत यावी व हा जमलेल्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे संदर्भात चिकन,मटण दुकाने असणाऱ्यांना व चिकन65 च्या गाड्या असणाऱ्यांना नोटीस काढून 15 दिवसाची मुदत द्यावी तरीही त्यांचेकडून तसे न झालेस त्यांचेवर दंडात्मक कडक कारवाई करणेत यावी. 

5) डॉग व्हॅन युनिटमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून ती वाढवण्यात यावी व प्रत्येक प्रभागात एक डॉग व्हॅन देणेत यावी.

6) मनपा क्षेत्रातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची नव्याने गणना करण्यात यावी.

Share

Other News

ताज्या बातम्या