8 जुलैला पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा  आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती 4 जुलै पर्यंत कळवावी

  • लक्ष्मण फुंडे (पवनी)
  • Upadted: 02/07/2020 4:37 PM

भारतीय माहिती अधिकार न्युज नेटवर्क समूह भंडारा जिल्हा प्रतिनिधी :- लक्ष्मण फुंडे भंडारा दि.1: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडाराच्या वतीने ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 8 जुलै 2020 रोजी करण्यात येणार आहे. सध्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शासनाने टाळेबंदी लागु केलेली आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापना, व्यवसाय आणि उद्योग पुरेशा प्रमाणात सुरु झालेले नाहीत. बरेचसे परप्रांतीय कामगार, मजूर हे त्यांच्या निघून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आस्थापनांना मनुष्यबळाची भासणारी कमतरता पाहता स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा ,यासाठी नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या सोयीनुसार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्तांनी रिक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन जॉब फेअर भंडारा-1 येथे घेवून आपल्या आवश्यकतेनुसार बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध असलेली यादी ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करावी किंवा ऑफलाईन पध्दतीने रिक्त पदांची माहिती 4 जुलै 2020 पर्यंत या कार्यालयाला कळविण्यात यावे. तसेच नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन जॉब फेअर भंडारा-1 येथे ऑनलाईन अप्लाय करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांचेशी दुरध्वनी क्रमांक 07184-252250 वर संपर्क साधावा.

Share

Other News

ताज्या बातम्या