ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

अनाधिकृत बांधकामावर कारवाई साठी मुंडण आंदोलन!


  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 10/29/2020 11:35:44 PM

डोंबिवली : कल्याण -डोंबिवली शहरामध्ये अनाधिकृत बांधकामे फोफावली आहे.अश्या बांध कामावर कारवाई प्रशासनाकडून केली जात नाही. अशी बांधकामे थांबावि म्हणून मागील चार वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर प्रयत्न करत आहे .

महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी  अनाधिकृत बांधकामावर कारवाई व्हावी म्हणून महेश निंबाळकर यांनी शहरामध्ये ठीक ठिकाणी हातामध्ये फलक पकडून आंदोलन चालू केले. आज या आंदोलनाचा आज १३ वा दिवस असल्याने निंबाळकर यांना १३ श्राध्द  दिवस घालायचा होता पण कोविड महामारी असल्याने तो साजरा करू शकत नाही असे त्यांनी कबुली दिली.त्यामुळे त्यांनी स्वताचे मुंडण करून आज आंदोलनाचा १३ दिवस मुंडण आंदोलन म्हणून घोषित केला. 

छोट्या बांधकामावर कारवाई करून प्रशासन मोठ्या अनाधिकृत बांधकामावर दुर्लक्ष करत आहे. आतातरी प्रशासन लक्ष देणार का  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share

Other News