ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

रेती माफियांना पवनी तहसीलदारांचे पाठबळ


  • लक्ष्मण फुंडे (पवनी)
  • Upadted: 10/28/2020 8:45:50 PM

.          
● उजवा कालवा ट्रक च्या लोडमुळे फुटण्याच्या मार्गावर
● मुर्दाड प्रशासनाला जाग केव्हा येणार..? जनतेचा संतप्त सवाल

    प्रतिनिधी पवनी :- दामोधर सुरकर

पवनी(भंडारा)  :- पवनी तालुक्यात अवैध रेती मुळे कहर माजला आहे. १३ घाटा वरून ५०० ट्रक वरून ७०० ट्रक अशी २०० ट्रक रेती चोरीची वाढ झाली आहे. आता गुडेगाव, धानोरी, भोजापूर घाटाची वाहतूक उजवा कालव्या वरून सुरू आहे. हा कालवा केव्हाही फुटू शकतो. पवनी तहसीलच्या भरारी पथकाने जप्त केलेले रेतीचे ३ ट्रक एसटी आगारात लावण्यात आले.  रेती माफियांना माहिती होताच रंगारी मॅडम यांनी चक्क आपल्या लेखी पत्राने आगार प्रमुखांना रेतीचे ट्रक सोडण्याचे फर्मान सोडले.

      रेती व्यवसायामध्ये  नवनवीन लोक आलेत. ते मंत्रालय सोबत नाते सांगतात. "उपर से हमारी सेटिंग है" अशी बतावणी करतात. मागील आठवड्यामध्ये या रेती माफिया मध्ये  तहसील कार्यालयासमोर भांडण झाले. त्यात सहा कट्टे (बंदूक) निघाले. परंतु कोणीच लक्ष देत नाही .
 अवैध रेती विरोधात भाजपा तालुका अध्यक्ष मोहन सूरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन ,उपोषण करण्यात आले. उपोषण सोडविताना मंजूर केलेल्या मागण्या प्रशासन विसरले.  नव्या दमाने रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. भरारी पथक आहेत. पण तहसील तहसीलदार मॅडम एकटेच जातात. जेव्हा भरारी पथक जाते ते गाड्या पकडतात. त्या भरारी पथकांना फोन करून ट्रक सोडण्याचे फर्मान सोडतात. हा तोंडी फर्मान कमी होते म्हणून त्यांनी आता लेखी फर्मान देणे सुरू केले आहे. दिनांक २७/१० च्या रात्री ८.३५ वाजता निलज पवनी रोडवर g पकडलेले रेतीचे ३ ट्रक  MH-40- 65 57,  MH-40-..BG-4587, MH-40- BL-28 45  तहसीलदार नीलिमा रंगारी मॅडमच्या आदेशाने सोडण्यात आले .याची चौकशी करून अकार्यक्षम निलिमा रंगारी मॅडम यांना निलंबित करण्याची मागणी  जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मोहन सुरकर यांनी केली.यावेळी राजेंद्र फुलबांधे, हिरालाल वैद्य, मच्छिंद्र हटवार, दत्तू मुनरतीवार उपस्थित होते.

Share

Other News