कटगंटोला जवळील वळणावर कारची मोटारसायकल ला धडक एक जागीच ठार एक गंभीर

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 17/10/2020 12:48 PM

कुरखेडा :- 

          भरधाव वेगात असलेल्या बेलोरो चार चाकी चाकी वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला  धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना कुरखेडा मालेवाडा रोडवर कटंगटोला गावाजवळ असलेल्या वळणावर शनिवारी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.
        हरिदास पदा वय 35रा.खुटगाव तालुका धानोरा असे मृतकाचे नाव असून पुष्पलता भारद्वाज वय 30 रा. दिल्ली असे जखमी युवतीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार दिल्ली येथील एका एनजीओमध्ये कार्यरत असलेल्या पुष्पलता भारद्वाज व हरिदास पदा हे दोघेजण कुरखेडा येथे आम्ही आमच्या आरोग्यासाठी  संस्थेत रात्री मुक्कामी होते आज सकाळी तालुक्यातील न्याहारपायली येथील काम आटोपून  कोरची तालुक्यातील काही सेवानिवृत्त शिक्षकांच्या मुलाखती घेण्यासाठी जाणार होते दरम्यान कटंगटोला गावाजवळ असलेल्या वळणावर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहन क्रमांक सीजी 08 ऐएम 8394 या गाडीने मोटरसायकलला धडक दिली यामध्ये मोटरसायकल चालक जागीच ठार झाला तर एक युवती गंभीररित्या जखमी झाले जखमी युवतीवर  येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.







नितिन देविकार (गडचिरोली जिल्हा उपसंपादक)
9404231937

Share

Other News

ताज्या बातम्या