भयमुक्त नशामुक्त अभियानांतर्गत नागरिकांनी35 हजार हुन अधिक लोकांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने अर्ज भरले होते ते आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी जिल्ह्यातील भयानक परिस्थिती जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली खूण कुणाचे प्रयत्न दरोडे दहशत माजवणे हे सर्व अमली पदार्थ गांजा ड्रग्स यासह अवैध धंदे यामुळे ही गुन्हेगारी वाढली आहे यावर आपण जिल्हा दंडाधिकारी म्हणून लक्ष घालून हे ताबडतोब बंद करावे जिल्हा पोलीस प्रशासन राजकीय दबावापोटी किंवा वैयक्तिक फायद्यापोटी आपलं कर्तव्य सोडून बघायची भूमिका घेत आहेत त्यांचे ताबडतोब कान टोचावे अन्यथा सांगलीमध्ये रस्त्यावर फिरणं ही मुश्किल होईल अशी परिस्थिती झाल्यास जनतेमध्ये उद्रेक होईल आणि तो उद्रेक सर्व प्रशासनाला खूप महाग पडेल अशी भूमिका जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडली यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत आता विधान परिषदेच्या निवडणुका चालू आहेत या निवडणुका 22 तारखेपर्यंत संपतील त्यानंतर आपण पोलीस प्रशासन महसूल प्रशासन फूड अँड ड्रग्स असेल या गोष्टींमध्ये जबाबदार असणाऱ्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत एक भयमुक्त नशा मुक्त समितीची बैठक आयोजित करून यामध्ये समाधानकारक असा तोडगा काढू व जिल्ह्याला भयमुक्त व नशा मुक्त करू असे आश्वासन जिल्हा अधिकारी यांनी दिले.
यावेळी सतीश साखळकर शंभूराज काटकर कुलदीप देवकुळे रोहित कबाडे रविंद्र वळवडे बटू करडे रोहित घुबडे पाटील अमित पाटील स्वप्निल शिंदे कुमार सावंत सुजित पवार अमर औरादे सागर कोळेकर सह अनेक समितीचे निमंत्रक उपस्थित होते.