नांदेड :- इंटरव्हेंशनल आणि न्यूरो रेडिओलॉजिस्ट हे आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक प्रगत क्षेत्र आहे, ज्यामध्ये शस्त्रक्रिया न करता (किंवा कमीत कमी चिरफाड करून) शरीराच्या आतील गंभीर आजारांवर उपचार केले जातात यात एक्स-रे, सीटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड किंवा एमआरआय यांसारख्या इमेजिंग तंत्रांचा वापर करून कॅथेटर (बारीक नळी) द्वारे शरीराच्या आत जाऊन मिनिमल ईन्हेझिव्ह पद्धतीने उपचार केले जातात ज्यात कमी चिरफाड आणि कमी जोखीम असते अशी माहीती यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथील इंटरव्हेंशनल आणि न्यूरो रेडिओलॉजिस्ट डॉ.मनीषा जोशी यांनी पत्रकार परिषेदेत दिली .
पुढे त्या म्हणाल्या की, आम्ही न्यूरो रेडिओलॉजिस्ट हे मेंदू, मान आणि पाठीच्या कण्यातील रक्तवाहिन्यांच्या आजारांवर विशेष उपचार करतो ज्यात मेंदू स्ट्रोक म्हणजे स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये मेंदूतील गुठळी काढण्यासाठी 'मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी' या तातडीची उपचार पद्धतीचा वापर तसेच ब्रेन एन्युरिझम ज्यात मेंदूतील रक्तवाहिनी फुगणे किंवा फाटणे, यावर 'कॉइलिंग' किंवा 'स्टेंटिंग') द्वारे उपचार करणे शिवाय एव्हीएम म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्यांचे चुकीचे जाळे 'एम्बोलिझेशन'द्वारे बंद करणे तसेच कॅरोटीड स्टेनोसिस ज्यात मानेतील रक्तवाहिनी अरुंद होणे, ज्यामध्ये स्टेंट टाकून ती रुंद करणे असे उपचार करतो
ब्रेन एन्युरिझम्स म्हणजे काय ?
जेव्हा तुमच्या रक्तवाहिनीची भिंत कमकुवत होते आणि बाहेर फुगते तेव्हा एन्युरिझम होतो. मेंदू किंवा सेरेब्रल एन्युरिझम म्हणजे जेव्हा हे तुमच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये होते. मेंदूच्या धमनीविकार फाटणे किंवा गळती होण्याचा धोका आहे जो विनाशकारी असू शकतो, विशेषत: योग्य वेळी वैद्यकीय मदत न घेतल्यास कठीण परिस्थिती निर्माण होते ..
ब्रेन स्ट्रोक लक्षणे ?
लहान एन्युरिझम्स कोणतीही लक्षणे दिसत नाहीत तथापि, मोठे धमनीविस्फारणे आणि फाटणे किंवा गळती होणारी धमनी धोकादायक असते त्यावेळी त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते जसे एक मोठा न फुटलेला एन्युरिझम जवळच्या नसांवर दाबू शकतो आणि मेंदू मेदयुक्त आणि एकतर्फी होऊ शकते डोकेदुखी, डोळ्याच्या वर किंवा मागे वेदना, चक्कर येणे, बोलणे, हालचाल करण्यात अडचण, एकतर्फी सुन्नपणा किंवा अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात ..
मोठ्या चौकटीत ..
ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी काळजी
यात उच्च रक्तदाब नियंत्रण , रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर कोलेस्टेरॉल प्लेक्स नियंत्रण , धूम्रपान निषेध , दारू बंद करणे व शारीरीक हालचाल वाढविणे हे गरजेचे आहे , सिद्धांत असा आहे की जेव्हा रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह अशांत होतो, तेव्हा रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होतात आणि हळूहळू बाहेर ढकलल्या जातात ज्यामुळे फुगवटा निर्माण होतो जो टाळला पाहीजे
डॉ. मनीषा जोशी
एमबीबीएस, डीएमआरडी, डीएनबी (रेडिओलॉजी), डीएम (न्यूरो-रेडिओलॉजी), ईबीआयआर,
वरिष्ठ सल्लागार - इंटरव्हेंशनल आणि न्यूरो रेडिओलॉजिस्ट
येथे करा संपर्क :-
यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद च्या उपचारांसाठी संपर्क अधिकारी श्री अनिल जोंधळे ९१५४९९५४६३ किंवा श्री किरण बंडे ९१५४१६७९९७ आदी क्रमांकावर संपर्क साधावा