ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नवी मुंबई : डॉ संदिप डोंगरे यांचा जागतिक विक्रम.


  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 9/25/2020 7:59:10 PM

नवी मुंबई : जुन्नर तालुक्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावणपूण्य झालेल्या तालुक्यातील सुपुत्र डॉ संदिप डोंगरे यांनी योगातील सुर्यभेदी प्राणायाम या प्रकारात वीस मिनिटांत ३५०० सायकल पुर्ण करीत जागतिक विक्रमाला गवसनी घालून महाराष्ट्राच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.या विक्रमामुळे समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर कोतूकाचा वर्षाव होत आहे. डॉ संदिप ऐरोलीत अष्टांग योगा आणि नॅचरोथेरपी इन्स्टिट्यूट चालवून गरजूंना आरोग्य विषयक प्रशिक्षण देतात. त्यांच्या यौगिक अभ्यासक्रमाला नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची मान्यताही मिळाली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशस्वीतेसह चिंता मुक्त सुदृढ निरोगी दीर्घायुष्यासह उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!

Share

Other News