खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनच्या दरनिश्चितीसाठी समिती

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 16/09/2020 12:34 PM


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, राज्य सरकारने खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
याआधी आरटीपीसीआर किट, व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियम किट, व्हायरल आरएनए एक्स्ट्रॅक्श्न किटसह एकत्रित दर 148 रुपये असल्याचे हाफकिन महामंडळाने जाहीर केलेल्या निविदेवरून स्पष्ट झाले होते.
तसेच यापूर्वी राज्य सरकारने मास्क, सॅनिटायजर यांचे दर कमी करण्याचाही निर्णय घेतल्यानंतर आता सिटी स्कॅनसाठी खाजगी रुग्णालये जास्त दर आकारत असल्याच्या तक्रारीनंतर याविषयी निर्णय घेतला आहे.
    आरोग्यमंत्री टोपे म्हणाले..:
▪️ कोविड-19 च्या निदानासाठी सिटीस्कॅन (HRCT)चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे खाजगी रुग्णालयामार्फत यासाठी 10 हजार पेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, तशा तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत.
▪️ सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व परवडणाऱ्या दरात सिटीस्कॅन (HRCT) चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी यासाठी सिटीस्कॅनचे कमाल दर निश्चित करणे संदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या