*रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली कडून
स्वच्छता दूताना रेनकोट वाटप*
सामाजिक बांधिलकी च्या भावनेने रोटरी क्लब सदस्य कार्य करत असून मनपाच्या स्वच्छता दूतांना रेनकोटचे वाटप करून रोटरीने त्यांची काळजी घेतली असे प्रतिपादन सांगली मिरज कुपवाड मनपा उपायुक्त वैभव साबळे यांनी केले.ते रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली कडून स्वच्छता दूताना रेनकोट वाटप प्रसंगी बोलत होते.
रोटरीच्या सामाजिक सद्भावनेचा उपक्रम म्हणून पावसाळ्यात संपूर्ण सांगलीकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्वच्छता दूतांना गैरसोय होऊ नये व त्यांचेही आरोग्य कायम राहावे हा यामागचा उद्देश आहे.
याप्रसंगी रोटरी क्लब कृष्णा व्हॅली चे अध्यक्ष स्वप्निल पाटील, सचिव राहूल पाटील ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद चौगुले, उदय कुलकर्णी तसेच राजेंद्र मेढेकर, शीतल पाटील आदी उपस्थित होते.