कृष्णा नदी पात्रात तरुणांनी स्टंटबाजी करू नये, लोकहित मंचचे आवाहन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/07/2024 11:26 AM


सांगली प्रतिनिधी / दि २३,
         लांबलेल्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोर धरायला सुरुवात केली असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तसंच पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढताना दिसत आहे. शिवाय आज पासून कोयना धरणातून १०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याने कृष्णा नदीची पाण्याची पातळी आणखी वाढणार असल्याने सांगलीतील आयर्विन पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या घेऊन स्टंटबाजी करण्याचा अनेक तरुण प्रयत्न करत आहेत. शिवाय पुलावरून सेल्फी काढण्याचाही प्रयत्न अनेक तरुण-तरुणी करताना दिसून येत आहेत. असे केल्याने या तरुणांचा जीव धोक्यात येऊ शकतो त्यामुळे तरुणांनी पोहायला जाऊन व सेल्फी च्या नादात धोका पत्करु नये. असे आवाहन लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगलीतील तरुणांना केले आहे. 
          यावर आळा घालण्यासाठी महानगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनानेही लक्ष घालून या ठिकाणी गस्त वाढवावी जेणेकरून अशा एखाद्या तरुणाचा जीव जाऊ नये.अशी मागणीही लोकहित मंचच्या वतीने भिसे यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या