आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचा भव्य नागरी सत्कार.
दहिवडी, दि:
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नागरी सत्कार निमित्त भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान वरकुटे मलवडी ता.माण येथे रविवार दि.२१ जुलै रोजी.
आयोजित केले आहे.
अभयसिंह जगताप यांनी महाराष्ट्राच्या मातीतील रांगड्या मैदानी खेळाडूंना वाव देण्यासाठी हे कुस्ती मैदान आयोजित केले असून यातील प्रथम क्रमांकाची रक्कम ६ लाख रुपयेची कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथील सुप्रसिद्ध पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध भारत केसरी पैलवान
प्रिन्स कोहली ( कोहली आखाडा पंजाब ) यांच्यात होणार असून द्वितीय क्रमांकाची रक्कम ५ लाख रुपयांची कुस्ती माण तालुक्याचा चमकता तारा उपमहाराष्ट्र केसरी पै.किरण भगत विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता पै.संदीप वडवान (पंजाब ) व तृतीय क्रमांकाची कुस्ती रक्कम रुपये ४ लाख उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदक विजेता पै. बिन्ना कुमार ( हरियाणा ) तृतीय क्रमांकाची दुसरी कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै.हर्षवर्धन सदगीर व चतुर्थ क्रमांकाची कुस्ती रक्कम रुपये ३ लाख. आंतरराष्ट्रीय खेळाडू पै.अमोल नरळे विरुद्ध पै.अविनाश पाटील, पाचव्या क्रमांकाची कुस्ती रक्कम रुपये २ लाख रुपये महाराष्ट्र चॅम्पियन पै.गणेश कुंकूले ( पिंपरी ता. माण ) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै.शुभम सिदनाळे, सहाव्या क्रमांकाची कुस्ती रक्कम रुपये एक लाख. उपमहाराष्ट्र केसरी पै.संदीप मोटे विरुद्ध उपहिंद केसरी पै.तुषार दुबे,सातव्या क्रमांकाची कुस्ती एक लाख रुपये महाराष्ट्र चॅम्पियन पै.महारुद्र काळेल विरुद्ध पै. सुदर्शन कोतकर, आठव्या क्रमांकाची कुस्ती एक लाख रुपये.महाराष्ट्र चॅम्पियन पै.प्रशांत शिंदे विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेता पै. संग्राम पाटील, महिला कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पै. वेदांतिका पवार विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पै.सानिका पवार या सर्व नामांकित मल्लांच्या भव्य अशा कुस्त्या पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो कुस्तीप्रेमी हजेरी लावतील. त्याच बरोबर महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या मुलांच्या एकूण ५८ कुस्त्या होणार असल्याचे या कुस्ती मैदानाचे आयोजक ऋषी भैय्या जगताप यांनी सांगितले आहे.
कुस्ती मैदानामध्ये प्रमुख उपस्थिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा अभयसिंह जगताप यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असून यासाठी प्रमुख उपस्थिती माण व खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व अभयसिंह जगताप युवा मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून. प्रमुख उपस्थितीमध्ये पै. संदीप मांडवे, पै. नितीन राजगे,पै. बाळासाहेब काळे, पै. तानाजी विरकर, पै. एम.के. आबा,पै. सचिन नरळे,इत्यादी उपस्थित राहतील.
.......
मनोरंजन कुस्ती संपूर्ण देशभरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध असणारा पै. देवा थापा विरुद्ध पै. रवी कुमार ( हिमाचल प्रदेश ) यांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याची शक्यता आहे.
........
महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा होणार सत्कार..
सुप्रसिद्ध डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, मल्ल सम्राट रावसाहेब मगर आप्पा, मल्ल सम्राट आसलम काझी, अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार पुणे, उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम, कुस्ती महर्षी संभाजी सावर्डेकर, हरीश बापू कदम, महाराष्ट्र केसरी गोरख सरक, महाराष्ट्राची कुस्ती जिवंत ठेवणाऱ्या या सर्व मल्लांचा अभयसिंह जगताप यांच्या वतीने होणार सन्मान..