प्रति
मा.आयुक्त
सांगली मिरज आणि कुपवाड शहर
विषय :- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागातील खुदाई कामगार बाबत
महोदय
आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मधील पाणी पुरवठा विभागात खुदाई कामगार किती आहेत त्यांची कधी कधी भरती करण्यात आली आहे त्यांना रोज कामाच्या सोयीनुसार कोण कोणते काम लावण्यात येते त्या कामाची जबाबदारी घेण्या इतपत त्याची शैक्षणिक पात्रता आहे का?
याची चौकशी करण्यात यावी...
तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या प्रमाणात व्हालमन लागतात तेवढे असताना सुद्धा जाणीवपूर्वक खुदाई काम करणाऱ्यांना व्हलमनची ड्युटी लावण्यात येते आणि खुदाईला कामगार कमी पडतात.
त्यामुळे मनपा क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी ज्या पाण्याच्या पाईपलाईन लिकेज झालेले आहेत त्यातून हजारो लिटर पाणी वाया जाते या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी व सक्षम अधिकारी कर्मचारी ह्या बाबतीत नेमावेत अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल..
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना कृष्णा नदी मध्ये पाणी नाही म्हणून पाणी पुरवठा कमी होतेय असे मनपा प्रशासन सांगते मात्र
छत्रपति शाहू महाराज रोड (100 फुटी) येथे मनपा पाईप लाईन लिकेज झाली आहे आणि ती वारंवार होते ह्याला जबाबदार कोण?