आंतरराष्ट्रीय किर्तीचे यूरॉलॉजिस्ट व यूरो आन्कोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद खोचीकर यांचा यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत त्यांचा सन्मान करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या निमित्ताने यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडीया यांच्या विध्यमाने गेले सहा दशकात यूरॉलॉजीच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या संशोधकांच्या कामाची अत्यंत सखोलपूर्वक चिकीत्सा करून योग्य संशोधकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. सर्वोत्तम संशोधन किंवा नवनिर्माण यांची निवड करताना या संस्थेने लावलेले निकष अत्यंत कठीण असे होते.
अविष्कार या क्रार्यक्रमा अंतर्गत यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडीया यांनी अशा संशोधकांची या कठीण निकषावर सखोल चर्चा व शोध करून २० शास्त्रज्ञ व संशोधक यांची निवड केली.
मुत्राशयाच्या कर्क रोगांमध्ये शस्त्रक्रियेमध्ये येणारे अडथळे व आव्हाने यांचा सामना करताना डॉ मकरंद खोचीकर यांनी नवीन तंत्रज्ञान १९९८ साली केंब्रिज येथे असताना विकसित केले होते. मुत्राशयाच्या कर्करोगामध्ये रेडीएशनच्या ट्रीटमेंटनंतर मुत्राशय काढून खुप क्लीष्ट व आव्हानात्मक असायचे. डॉ खोचीकर यांनी इंडो जी आय स्टेपलर या तंत्रज्ञानाचा वापर करून ही शस्त्रक्रीया अत्यंत सुखकर केली आणि त्याची नोंद ब्रिटीश नियतकालिकाने त्वरीत घेतली. तेंव्हा पासून डॉक्टर खोचीकर यांनी विकसित केलेल्या तंत्राच आणि संशोधनाचा जगभरात मोठयाने प्रसार झाला. आज २५ वर्षानंतरही हे तंत्र तेवढेच उपयुक्त ठरत असून मुत्राशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांना एक वरदान ठरले आहे. रोबोटीक व दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रीय मध्ये सुद्धा आता या तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर होतो.
या संशोधकामध्ये भारतीय तसेच मूळ भारतीय पण परदेशस्थ संशोधक यांचा समावेश आहे. अशा संशोधनाचा गौरव व्हावा आणि इतिहासाने त्याची नोंद घ्यावी यासाठी यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडीया यानी हा उपक्रम हाती घेतला होता.
आजवरच्या माझ्या असंख्य संशोधनापैकी या संशोधनाची २५ वर्षे होऊनसुध्दा उपयुक्तता टिकली आहे याचा मला खूप समाधान आहे असे मत डॉक्टर खोचीकर यांनी व्यक्त केले.
त्यांच्या या कार्याबदद्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्वातून त्यांचे कौतुक होत आहे. तंत्रज्ञान ठरले कौतुकास्पद

त्यांच्या या कार्याबदद्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्वातून त्यांचे कौतुक होत आहे.
ते सध्या उषःकाल अभिनव हॉस्पीटल धामणी रोड सांगली व सिद्धी विनायक कॅन्सर हॉस्पीटल मिरज येथे कार्यरत आहेत.