मिरज - पुणे साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ६ जुनपासून सुरू होणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/05/2023 5:48 PM

 
  मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून गाडी क्रमांक ०१४२३ / २४ मिरज पुणे मिरज अशी प्रत्येक मंगळवारी धावणारी साप्ताहिक स्पेशल एक्सप्रेस येणाऱ्या ६ जून पासून सुरू होत आहे. ही एक्सप्रेस  पुणे येथून सकाळी ८ वाजता निघेल व मिरज येथे दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल व त्याच दिवशी दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी पुण्याकरिता सुटेल व संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पुणे येथे पोहोचेल. या गाडीस सांगली, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी असे थांबे देण्यात आलेले आहेत. सदर सुरू होणारी साप्ताहिक एक्सप्रेस चा प्रवाशांनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन *रेल्वे प्रवासी सेना चे कार्याध्यक्ष संदीप शिंदे* यांनी केली आहे.
          वास्तविक पाहता ही साप्ताहिक एक्सप्रेस गाडी क्र. २०४७५/७६ पुणे बिकानेर पुणे साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे या गाडीचा मिरज पर्यंत विस्तार करण्यात आलेला आहे परंतु मध्य रेल्वे पुणे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे या गाडीस
 बिकानेर पुणे व पुणे मिरज परतीच्या प्रवासासाठी मिरज पुणे व पुणे बिकानेर अशी दोन तुकड्यात चालवली जात आहे. जर ही एक्सप्रेस गाडी मिरज बिकानेर अशी सोडल्यास या गाडीचा संपूर्ण एच ओ कोटा हा मिरजेला मिळेल त्यामुळे पुणे स्थानकाचे महत्व कमी होईल.कारण मध्य रेल्वे पुणे विभागाचे पुणे नंतर मिरज जंक्शन हे महत्त्वाचे स्थानक आहे.त्यामुळे मध्य रेल्वे कडुन एकही एक्सप्रेस मिरज मधुन सुरु केलेली नाही. मध्य रेल्वेने फक्त पुण्यातून बिकानेर कडे जाणाऱ्या लोकांचा विचार केलेला आहे मिरज मधून गुजरात व बिकानेर करिता जाणाऱ्या लोकांचा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने  काहीही विचार केलेला नाही तरी सदर गाडी मिरज ते पुणे व पुणे ते मिरज दरम्यान स्पेशल सेवा व स्पेशल दर आकारणी केली आहे. त्यामुळे मिरज ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांना नाहक जास्त प्रमाणात भुर्दंड बसणार आहे सर्वसाधारणतः मिरज ते पुणे २८० कि.मी.साठी एसी थ्री टायर ११०० रुपये दर आकारला जाईल तर तोच दर १३५६ कि.मी. पुणे ते बिकानेर साठी १६१० रुपये आकारला जाईल यामुळे मध्य रेल्वे पुणे विभागाची सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी सपत्नीक वागणूक आता स्पष्ट झालेली आहे. तरी सदर गाडी मिरज पुणे मिरज स्पेशल न सोडता मिरज बिकानेर एक्सप्रेस म्हणुन  सोडण्यात यावी अशी मागणी *मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत* यांनी केलेली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या