संधीला "मोहीत" करणारा मोहित शर्मा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/05/2023 2:33 PM

कालची मॅच अफलातून झाली. शेवटच्या दोन चेंडूवर ठरवून षटकार आणि चौकार मारणे हे Jaddu ने दाखविले तेवढे सोपे नाही.

CSK, MSD आणि sir Jadeja यांचे कौतुक तर सर्वांनी केलेच आहे. पण तेवढेच कौतुक शेवटची over टाकणाऱ्या मोहित शर्मा चेही आहे. वेगवान गोलंदजांचे करिअर फार मोठे नसतेच...मोहित पण करिअरच्या अंताकडेच आहे.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण unsold असलेला मोहित GT च्या टीम मध्ये नव्हताच. तर तो GT च्या फलंदाजांना सराव देण्यासाठी Net Bowler म्हणून रुजू झाला होता. फार थोड्या खेळाडूंनी असे करण्याचे धाडस केले असते. 

मोहित शर्मा ने net मध्ये चांगली गोलंदाजी केलीच , सोबत स्वतःचा फिटनेस पण राखला. कुणीतरी दुखापतग्रस्त झाला आणि त्या ऐवजी मोहितला संधी मिळाली.

यातून दोन धडे महत्वाचे
1. संधीसाठी जे तयार असतात त्यांनाच ती मिळते
2. संधी बऱ्याच वेळा रूप पालटून येते. बऱ्याचदा नीरस, बेचव आणि नामुष्की सारखी दिसते.

संधीला "मोहित" करावे लागते !!

सलिल चौधरी
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स

Share

Other News

ताज्या बातम्या