देवळाली कॅम्पला शनिवार पासून पाणीपुरवठा होणार सुरळीत, नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने टाक्या स्वच्छ करणे होते गरजेचे

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 18/03/2023 12:22 PM

देवळाली कॅम्पला शनिवार दिनांक १८ पासून पाणीपुरवठा होणार सुरळीत, नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने टाक्या स्वच्छ करणे  गरजेचे होते ,
प्रतिनीधी l देवळाली कॅम्प 
केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुसार देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या  पाण्याच्या टाक्या साफसफाई करणे अनिवार्य होते.  १४ लाख लिटरची   मुख्य भूमिगत टाकी   साफसफाई करणे अनिवार्य होते.

 टाकीच्या गाळाची घनता 2.5 फूट असल्याने स्वच्छतेसाठी तीन ते चार दिवस लागणे अपेक्षित होते त्या नुसार बोर्डाचे  पाणी पुरवठा विभागाच्या  उपस्थितीत दिनांक 17 मार्च 2023 रोजी रात्री उशिरापर्यंत स्वच्छता करत तळगाठून स्वच्छता करण्यात आली.


देवळालीत पाणीपुरवठा शनिवारपासून म्हणजे १८ मार्च पासून सुरळीत होणार असून  पाहिल्या दिवशी कमी दाबाने काही भागात पाणी पुरवठा होईल नंतर रविारपासून सर्व आठही वॉर्डांत सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा अभियंता स्वप्नील क्षत्रिय यांनी सांगितले.


चौकट :- गेल्या आठ वर्षांपासून पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टरेशन टाकीची स्वच्छता करण्यात आली न्हवती देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीन नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते स्वच्छ करणे गरचेचे होते, त्या अनुषगाने शहरातील  पाण्याची टाकी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने स्वच्छ करण्याचे काम हाती घेऊन शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करण्यात आले असून. शनिवार पासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

जिथे पाणीपुरवठा कामी दाबाने तिथे टँकरने पाणीपुरवठा 
चौकट :- शनिवारपासून पाणी पुरवठा सुरळीत करन्यात आला असून जिथे पाणीपुरवठा कामी दाबाने व झाला नाहीं तिथे कँटोन्मेंट बोर्डाच्या वतीने मोफत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या