मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समितीची बैठक संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/03/2023 8:44 AM


        आज पुणे येथे मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांची बैठक पार पडली यावेळी सकाळी  कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करण्याबरोबर कोल्हापुर  निजामुद्दीन एक्सप्रेस या गाडीस तीन ज्यादा डबे व कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस या गाडीस तीन ज्यादा डबे कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस या गाडीत तीन जनरल डबे व कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीस दोन स्लीपर डबे व दोन एसी थ्री टायर डबे आणि कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस या गाडीस एक ज्यादा डबा लावण्याच्या सदस्यांच्या मागणीला मान्यता मिळाली. दादर पंढरपूर एक्सप्रेस या गाडीचा मिरज पर्यंत विस्तार करून मिरज दादर एक्सप्रेस व्हाया पंढरपूर अशी गाडी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सदर बैठकीमध्ये सांगण्यात आले. त्याचबरोबर लवकरच सह्याद्री एक्सप्रेस सुरू होणार व लवकरच मिरज स्थानकामध्ये मध्ये सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणात लावण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.
त्याचबरोबर कोल्हापुर,हातकलगडे,मिरज,सांगली,सातारा या स्थानकाचे "अमृतभारत" योजनेखाली नविनीकरण करण्याचे नियोजन आहे त्यासाठी प्रवाशांच्या मधुन 31 मार्च अखेर सुचना मागवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर कोल्हापुर ते कलबुर्गी सकाळची नविन एक्सप्रेस लवकरच सुरु करण्याबाबतचे निवेदन सदस्यांनी  रेल प्रबंधकांना देण्यात आले.
कोल्हापुर अहमदाबाद एक्सप्रेस या गाडीस कराड येथे थांबा देण्याचे ही मान्य करण्यात आले.
यावेळी किशोर भोरावत,शिवनाथ बियाणी,श्रीनिवास शर्मा,अँड.विनित पाटिल,तानाजी कराळे व बशीर सुतार अदि सदस्य उपस्थित होते.
यावेळी रेल्वे प्रबंधक इंदु दुबे,वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डाँ.मिलिंद हिरवे,वरिष्ठ वाहतुक प्रबंधक डाँ.स्वप्निल निला व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या