श्रीश्री रविशंकर यांच्या हस्ते कोटी लिंगार्चन कार्यक्रमाचा शुभारंभ

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 02/02/2023 9:20 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी/ दहिवडी


शिंगणापूर:तीर्थक्षेत्र फाउंडेशनच्या आयोजनाने देशभरात प्रथमच घडणाऱ्या कोटलिंगार्चन या कार्यक्रमाचे अनुषंगाने वैश्विक आध्यात्मिक गुरु व आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते श्रीश्री रविशंकर ३ फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे कोटिलिंगार्चन कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी उपस्थित राहत त्यांच्या शुभहस्ते प्रथम लिंगार्चन व धर्मध्वजा उभारण्यात येणार आहे. खासदार श्रीउदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती सोहळ्यासाठी असणार आहे. विश्व कल्याणासाठी व विश्वातील शांततेसाठी श्रीश्रींचे कार्य अमूल्य आहे.सातारा जिल्ह्यासाठी त्यांचे विशेष योगदान आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत. कोविड काळातील व दुष्काळग्रस्त भागात केलेले मदत कार्य असेल किंवा सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेलं काम महत्त्वाची आहे. राम मंदिर सारख्या अत्यंत संवेदनशील विषयात गुरुजींच्या माध्यमातून सुवर्ण मध्य साधला गेला होता. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये शिखर शिंगणापूर येथे कोटिलिंगार्चन कार्यक्रम संपन्न होतोय. पूर्व नियोजित मुख्य उत्सव व त्यांचे  दौरे यामुळे व्यस्तता आहे. तरीही ते  तीर्थक्षेत्र फाउंडेशनच्या निमंत्रण स्वीकारत दिनांक ३ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जवळपास हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा हे या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष असून मोहन बडवे हे अध्यक्ष आहेत. कोटीलिंगार्चन  हा मुख्य सोहळा महाशिवरात्री पर्वकाळात दि.१६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी  असून यादरम्यान रोज लक्ष भोजन देखील आयोजित करण्यात आले आहे. व याच उत्सवाचा शुभारंभ श्रीश्री रविशंकर यांच्या हस्ते दि. ३ फेब्रुवारी रोजी  सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात सत्संगचे वं श्रीश्रींच्या ज्ञानसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.  तीर्थक्षेत्र फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्यातून हजारो भाविक  या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. आर्ट ऑफ लिविंग या संस्थेची देखील यासाठी मोठी मदत आम्हाला प्राप्त होत आहे. मंदार बडवे, चिन्मय बडवे , अभय तोडकर, अमोल येवले, आंनद बडवे वं सर्व सहकारी हे या माध्यमातून समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. प्रशासन व पोलिस यंत्रणेचा मोठा सहकार्य आम्हाला लाभत आहे अशी माहिती तीर्थक्षेत्र फाउंडेशनचे मुख्य समन्वयक अक्षय महाराज भोसले यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या