*लघुपटातून विद्यार्थ्यांना तंबाखू विषयी दुष्परिणाम दाखविले*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 24/01/2023 8:24 PM

           विद्यार्थी व्यसनाकडे वाळू नयेत यासाठी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाकरोंडी येथे तंबाखूच्या दुष्परिणामावर आधारित प्रोजेक्टर च्या मध्यामापासून लघुपट दाखवून विद्यार्थ्यांना सावधान केले तंबाखू सेवन करणार नाही याकरिता सर्वांना शपथ दिली तसेच तंबाखू विरोधी कोटप्पा कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एच. आर. भुरे होते मार्गदर्शक म्हणूण इंडियन डेंटल असोसियनचे प्रकल्प समनवक श्री. सतीन अंकलू सर, श्री. आकाश बनकर, श्री. गिरीश बांगळे, श्री. गितेश बांगळे यांनी विद्यार्थ्यांना चांगला प्रकारे मार्गदर्शन केले तसेच श्री. गेडाम सर, श्री. जुआरे सर, कू. बाळबुद्धे मॅडम, कू. वासनिक मॅडम, कु. चांदेवार मॅडम, श्री. भाकरे सर, श्री. म्हाशाखेत्री सर, श्री. वैद्य सर, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री. मेश्राम सर यांनी केले.
  शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाकरोंडी तंबाखू नियंत्रण, स्वच्छ मुख अभियान व तंबाखू जन्य पदार्थामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री. लांडगे अधीक्षक, कू. खोब्रागडे अधिक्षीका यांनी विशेष प्रयत्न केले.

Share

Other News

ताज्या बातम्या