आम्हाला पण न्याय द्या साहेब...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/11/2022 8:01 AM


संजय नगर पोलीस ठाणे येथे 1डिसेंबर 2017 रोजी मयूर कॉलोनी आरवाडे पार्क येथील दीपक काटे यांची मालवाहतूक वाहन जबरदस्तीने ओढून नेली म्हणून IIFL फायनांस कंपनीचे वसुली अधिकारी गायकवाड व इतर असे मिळून चार जनावर 392 अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा तब्बल 1 वर्षाच्या पाठपुरावा नंतर व आमरण उपोषण केल्यावर तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक बोराटे साहेब यांचे आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच तपास अधिकारी यांना तपास कामी मा.अप्पर पोलिस अधीक्षक यांनी काढलेल्या सूचना पत्रात सदर मालवाहतूक वाहन आरोपी कडून जप्त करण्याचे सूचना देऊन सुद्धा तपास अधिकारी यांनी ते वाहन जप्त केले नाही.
या संबंधित बोराटे साहेबान चे पदी नियुक्त मा.अप्पर पोलीस अधीक्षक डूबुले मॅडम यांचे कडे पाठपुरावा केला असता सविस्तर लेखी अर्जाद्वारे सदर मालवाहतूक जप्त करण्याचे आदेश संजयनगर पोलीस ठाणे द्यावेत अशी मागणी केली असता त्यांचे कडून सुद्धा कोणतही ठोस कारवाही झाली नाही.
त्या नंतर माहिती अधिकार अर्जा ने संबधित अर्जावर करण्यात आलेल्या करवाहीची माहिती मागितली असता संजयनगर पोलीस ठाण्याने घाई गडबडीने माहिती देण्यास लागू नये म्हणून तब्बल गुन्हा नोंद झाल्यावर अडीच ते तीन वर्षाने चार्ज शीट न्यायालयात दाखल करून सदर बाब न्यायप्रविष्ट असल्याने माहिती देता येत नाही असे गुळगुळीत उत्तर दिले आहे.
चार्ज शीट दाखल होऊन 2 वर्षे झाले तरी अजून सुद्धा आरोपीना न्यायालयाने अजून आरोपीना नोटीस काढलेली नाही, चार्ज फ्रेम केलेले नाहीत हीच खरी शोकांतिका.

ज्याचे मालवाहतूक थकीत तीन हफ्ते भरून सुद्धा ज्यांनी जबरदस्तीने पळवून नेले ते आरोपी निवांत व मोकाट आहेत, त्यांना ज्यां तपास अधिकारी यांनी पाठीशी घातले ते तपास अधिकारी निवृत्त होऊन निवांत आहेत.

आणि ज्याचे उत्पनाचे साधनच यांनी हिरावून घेतले तो दीपक काटे माझा मित्र मात्र आज मोल मजुरी करून जगत आहेच पण त्याचे व त्याचा कुटुंबाचे आयुष्य मात्र देशो धडीला लावले यात मात्र तीळ मात्र शंका नाही.

अजून ही वेळ गेलेली नाही पोलीस प्रशासनातील जबाबदार व न्यायप्रविष्ट अधिकाऱ्यांनी कायदाचा बडगा उगारून सदर वाहन आरोपीन कडून जप्त करून संजयनगर पोलीस ठाणे येथे आणावे.व रीतसर न्यायालयाच्या निर्णयायने फिर्यदिस सुपूर्द करावे एवढीच न्यायाच्या अपेक्षेने विनंती.

सदर घटनेचा मी मुख्य साक्षीदार असून फिर्यादिस न्याय मिळणे कामी आवश्यक ते सर्व खंडी भर पुरावे मी पोलीस प्रशासनास देईन.फक्त त्यांनी कारवाई करावी.

*श्री उदय ओंकार
सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या