विद्यार्थ्यांनो,तुमचं ध्येय तुम्हीच ठरवा:-राहुल डोंगरे

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 27/06/2022 6:49 PM


( करियर लांचर ऍकॅडमी येथे प्रतिपादन)

रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर:-जीवनात यशस्वी प्रत्येकाला व्हायचं आहे.उत्कर्ष आणि उन्नती ही दोन यशाची चाके आहेत.यशस्वी होणे म्हणजे आपल्या मनातून आपण ठरवलेले ध्येय साध्य करणे.यशस्वी होण्यासाठी तुम्हांला आकाशाला  मुळीच गवसणी घालावी लागत नाही.तुम्ही तुमच्या ध्येयाबाबत प्रामाणिक रहा आणि सातत्याने प्रयत्न करा.पालकांनो विद्यार्थ्यांवर कोणत्याही गोष्टी लादू नका.त्यांच्याकडून अतिजास्त अपेक्षा करू नका.विद्यार्थ्यांनो तुमचे ध्येय तुम्हीच ठरवा .विचाराला कृतीची साथ दया. यातूनच तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व समाजप्रबोधक राहुल डोंगरे यांनी केले.ते करियर लांचर अकॅडमी तुमसर येथे 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी करिअर लाँचर अकॅडमी चे संचालक पराग बानासुरे होते.कु श्रुष्टी चोपकर, कु आयुषी योगेश भुरे,भूषण रोडगे,रुजवाल मारबते,द्वीप भवसागर,कशीष लांजेवार,सौरभ नेरकर, कु आलीया कदिर शेख,कु मानवता तांडेकर,कुणाल सेलोकर,आस्था बडवाईक,मोहसीन बेग,साहिल खराबे,हर्षिता काळे,क्षितिज केवट,पार्थ चव्हाण,हिमानी बानासुरे, वैष्णवी चरडे, पियुष गाढवे, हर्षदा निंबारते, वेदांत रावलानी, वंश पटले,वेदांत वडीचार, साक्षी जाधव या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा करियर लौंचर अकॅडमी तर्फे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन  व आभार प्रा चव्हाण यांनी मानले.या सत्कार समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक सुध्दा आवर्जून उपस्थित होते...हे विशेष !

Share

Other News

ताज्या बातम्या