ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

तुमसरातील विनोबा नगरात १२० लोकांनी घेतली लस


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 10/25/2021 5:59:28 PM


रोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर :- नवयुवक शारदा उत्सव मंडल विनोबा नगर, बावनथडी कॉलोनी जवळ,खापाटोली तुमसर येथे १२० नागरिकांनी कोविड-19 प्रतिबंधक लसिकरणात कोविडशिल्ड लस घेऊन सहभाग घेतला. कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन शारदा मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी कोविडशिल्ड लसिकरण मंडळात घेऊन परिसरातील लोकांना कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करुन दिले. प्रभाग क्र. ११ विनोबा नगर, न्यु श्रीराम नगर इत्यादी परिसरात मंडळा मार्फत लसिकरणाच्या एक दिवसापुर्वी जनजागृती करण्यात आली होती.या लसिकरणात एकुण १२० नागरिकांनी कोविडशिल्ड लस घेऊन कोरोना संकट टाळण्यासाठी स्वताला सुरक्षित केलं हे विशेष. लसिकरण शिबिरातील टिम मध्ये कविता सेलोकर(नर्स),सुमित्रा आत्राम,श्री.ए.बी.सार्वे,श्री.ए.जी.बनकर,श्री.एम.एन.पिपरेवार,श्री.हिरालाल ढोमणे, कु.आर.ओ.पुरी,श्रीमती आर. टी. रहांगडाले होते. नवयुवक शारदा उत्सव मंडळ,विनोबा नगर तुमसर   या मंडळा द्वारे झालेल्या  तब्बल १२० नागरिकांचे कोविडशिल्ड लसिकरण या मोहिमेबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.नवयुवक शारदा उत्सव मंडळ,विनोबा नगर तुमसर या मंडळा द्वारे झालेल्या  तब्बल १२० नागरिकांचे कोविडशिल्ड लसिकरण या मोहिमेबाबत मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या लसिकरणात शारदा मंडळाचे सर्व कार्यकर्त्यानी लसिकरण मोहिम पुर्णत्वास आणली त्यात प्रामुख्याने कमलाकर निखाडे,नरेश ईळपाते, महेश गोमासे, दिनेश धुर्वे, जागेश धुर्वे,कमलेश मडावी,गोलु लांजेवार,आशिष लांजेवार,अभय नागदेवे, अनिल उचिबगले,रुषभ बाणासुरे, अमित नागदेवे, सुहास लांजेवार,गुड्डु डहरवाल,चेतन चौधरी,सचिन मलेवार,योगेश ईळपाते,रानु धुमनखेडे, शेखर बारई,एशु लांजेवार,दत्ता दमाहे, समिर दमाहे, सोनु भूरे व परिसरातील महिला व इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News