ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळमाफीयांना रोखण्याची शिवसेनेची मागणी...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/25/2021 4:12:39 PM


सांगली/ दि २५,

     शिवसेनेच्या वतीने अन्न व औषध प्रशासन आयुक्त सुकुमार चौगुले यांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात येणारे भेसळयुक्त खाद्य तेल, आकर्षक मिठाई,खवा, भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ व भेसळ युक्त खाद्य कलर व दिवाळीचे खाद्य फराळ याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
      या निवेदनातून अशी मागणी करण्यात आली की दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर परराज्यातून खास करून कर्नाटक,राजस्थान,गुजरात या राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात व सांगली जिल्ह्यात महापालिका क्षेत्रात व परिसरात खाद्य तेल,आकर्षक मिठाई,खवा,खाद्य फराळ तसेच भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ मोठया प्रमाणात आवक होत आहे सदरचे भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने सर्व नागरिकांना ह्रदयविकार,अर्धांगवायु,साधू पिंडाचे विकार, किडनीचे विकार, कॅन्सर यासारख्या भयंकर महारोगाने व रक्तविकार व साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते तसेच सर्वसामान्य नागरिक गंभीररित्या आजारी पडून आपला जीव गमवावा लागतो. त्या अनुषंगाने सदरचा प्रकार नागरिकांच्या जीवाशी कुठल्याही प्रकारे सदरच्या  अन्नभेसळ माफियांना खेळू देणार नसून यासंदर्भात योग्य वेळी वेळोवेळी पाठपुरावा करून सदरचा प्रकार हाणून पाडल्या शिवाय शिवसेना गप्प बसणार नाही अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळ यांच्यावतीने करण्यात आली. तसेच सदरच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन आयुक्त कार्यालय मुंबई तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील इतर सहाय्यक आयुक्त यांच्याकडून कोणत्याही प्रकारची भेसळयुक्त तयार फराळ व खाद्य तेल व इतर दुग्धजन्य पदार्थ व दूध व सर्व प्रकारचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ या विरोधात ठोस कारवाई केल्याचे दिसून आले नसल्याने सदरचे निवेदन देण्यात आले. सदरच्या निवेदनातून अशी मागणी करण्यात आली की महाराष्ट्र पोलीस यांनी त्यांच्या गृहखात्याच्या अंतर्गत योग्य ती परवानगी घेऊन सदरच्या वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे सर्व अन्नभेसळ  माफिया विरोधात पोलिसांनी सुद्धा स्वतंत्र छापेमारी करावी पोलीस प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन कार्यालय यांच्या कार्यालयाकडे बोट न दाखवता स्वतः स्वतंत्र छापेमारी करावी आपल्या कार्यक्षेत्रात सदरची कारवाई येत नसल्याचे त्यांनी न सांगता पोलीस प्रशासनाने यासंदर्भात ठोस कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली तसेच खाद्यपदार्थात भेसळ माफिया विरोधात राज्य सरकारने कायद्यात बदल करून सदरच्या कायद्यांमध्ये अशी तरतूद करण्यात यावी की एखादा अन्नभेसळ माफिया वरती 3 वेळेला अन्नभेसळ संदर्भात गुन्हे दाखल झाल्यास त्याच्यावरती मोक्कांतर्गत कडक कायदेशीर कारवाई करावी व जन्मठेपेसारखी शिक्षेची कडक तरतूद करावी जेणेकरून अन्नभेसळ माफियांविरोधात चाप बसून भेसळीला आळा बसण्यास मदत होणार आहे तसेच यावेळी अन्न व औषध आयुक्त कार्यालय सांगली  आयुक्त चौगुले यांना शिष्टमंडळाने मागणी करताना सांगितले की येत्या 4 दिवसात संपूर्ण अन्न भेसळ विरोधात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी बोलताना आयुक्त सांगली चौगुले यांनी शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन दिले की तात्काळ कुठल्याही परिस्थितीत अन्नपदार्थ भेसळीला पाठीशी घातले जाणार नसून तात्काळ भरारी पथके नेमून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी उपस्थित जितेंद्र शहा,लक्ष्‍मण वडर,रावसाहेब घेवारे,रविंद्र निकम, प्रथमेश हातेकर,शिवाजी पाटील,अविनाश शिंदे उपस्थित होते.

Share

Other News