ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*राज कुंद्रा प्रकरणाचं कोलकाता कनेक्शन*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/1/2021 4:55:57 PM

     ⭕मॉडेलनं केलेल्या दाव्यानं खळबळ!
 
बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस कोठडीमध्ये आहेत. 
मढ परिसरातील बंगल्यामध्ये सुरू असलेल्या अशाच चित्रीकरणावर पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये धाड घातली होती. 
त्या प्रकरणात राज कुंद्रा अटकेत असताना आता या अश्लील चित्रपट उद्योग निर्मितीचं कोलकाता कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. कोलकातामधून पोलिसांनी  एक मॉडेल आणि एका फोटोग्राफरला अटक केली असून मॉडेल्सला अश्लील चित्रपटांमध्ये काम करायला लावून त्या चित्रफिती वेब पोर्टलवर टाकल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे. 
 व्हि.डी.ओ. अपलोड होणाऱ्या वेबसाईट्सचा संबंध थेट राज कुंद्रा प्रकरणाशी असल्याचं एका मॉडेलनं केलेल्या तक्रारीमधून समोर येत आहे. 

⭕दोन मॉडेल्सनी केली होती तक्रार! 

पोलिसांनी पी.टी.आय.ला दिलेल्या माहितीनुसार,
 दोन मॉडेल्सनी गेल्या आठवड्यात या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. 
आपल्याला जबरदस्तीने अश्लील व्हि.डी.ओं.साठी शूट करायला लावल्याचं या दोघींनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. 
या आधारावर कोलकात्यातील विधाननगर पोलिसांनी सायबर सेल पोलिसांच्या मदतीने यात सहभागी असलेली मॉडेल आणि फोटोग्राफर यांचा शोध लावला. 
या दोघांच्या चौकशीतून अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे. 

⭕कशी होती मोडस ऑपरेंडी? 

तक्रार करणाऱ्या मॉडेल्सनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, फेसबुकवर फोटोशूटसाठी मॉडेल हवी असल्याची जाहिरात टाकण्यात आली होती. 
त्यानुसार, या दोघींनी संबंधित जाहिरातदारांशी संपर्क साधला. 
त्यानंतर त्यांना बोलावून त्यांच्यावर पॉर्न व्हि.डी.ओं.मध्ये काम करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली.

Share

Other News