ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा : घटस्थापना..!!


  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 10/17/2020 11:31:17 PM

जागर... आई राजा उदो उदो..!!

महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अलिकडल्या काळात अभिजनवादी गणेशोत्सवाच्या स्वरुपात मांडली जात असली तरी ;
हंगामी शेती करुन ईतर वेळी युद्धकर्म आचरण करणा-या मराठ्यांच्या महाराष्ट्रात कुलदेवता मातृशक्तीस्वरुप भवानीची आराधना मराठी समाजातील एकुणेक घटकानं , एकुणेक जातजमातीनं कुळाचाराच्या स्वरुपात पुरातन काळापासुन नेमानं पार पाडीत आणली आहे , हा खरा बहुजनोत्सव आहे .
घटस्थापनेच्या रुपात काळ्या आईला भवानीस्वरुप मानुन पुजणारा हा शेतक-यांचा महाराष्ट्र आहे.
कपाळी मळवट लेवुन माळपरडी मस्तकी धरुन , झांजसंबळाच्या तालावर , कुंकवात न्हाऊन भवानीचा ऊदोकार गर्जताना अंगावर फुटणारा काटा तुमच्यातल्या ख-या म-हाटीपणाची भावना जपत असतोय.

 श्रीभवानीचरणतत्पर 

Share

Other News