'पंतप्रधान मुद्रा योजना' कसे घ्यावे कर्ज..?

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 16/07/2020 11:19 PM

देशातील असंघटित लघुउद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने तयार केलेली 'पंतप्रधान मुद्रा योजना' म्हणजेच 'मुद्रा बँक कर्ज योजना' होय. यात 50 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. हे कर्ज बँक किंवा वित्तीय संस्थांमार्फत दिलं जातं. कर्जदार हा भारतीय असावा. त्याचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. पंतप्रधान मुद्रा योजनाअंतर्गत कर्जाची रक्कम आणि रीपेमेंट पीरियड आधारावर व्याज ठरवलं जातं. सरकारी बँकेनुसार 12 ते 18 टक्के व्याजदर असू शकते. तुम्ही ज्या व्याजदरात कर्ज घेतलं त्याच व्याजदरात ते माघार करावे लागते. आर्थिक वर्षानंतर बँकेनं व्याजदरात बदल केला आणि व्याजदर वाढवला तरीही नवीन व्याजदर तुमच्या कर्जावर लागू होत नाही. अर्जदाराला या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे व्यवसायाचा आराखडा (यात व्यवसायाची रचना, गुंतवणूक आराखडा, उत्पादनाचे स्वरूप, याशिवाय पणन आणि भविष्यकालीन निष्पत्तीबाबत पुरेपूर माहिती आवश्यक), स्वत:चे ओळखपत्र, निवासी पत्ता, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र घेऊन जाणे आवश्यक आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या