महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी शहरातून भव्य मिरवणूक, महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे मंथन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/04/2026 6:28 PM

नांदेडः ‘शिवा’ अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त शहरातून काढलेली भव्य मिरवणूक हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. मिरवणुकीनंतर झालेल्या जाहीर सभेत महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे मंथन करण्यात आले.
शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंतीचे हे 25 वे वर्ष होते. त्यानिमित्त संघटनेकड़ून जय्यत तयारी करण्यात आली होती. जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी खा. रवींद्र चव्हाण, जयंती समितीचे स्वागताध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संजय बेळगे, भाजप प्रवक्ते संतोष पांडागळे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बबन बारसे यांची यावेळी उपस्थिती होती. 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून निघालेल्या या भव्य मिरवणुकीची सांगता जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर एका जाहीर सभेतून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘शिवा’चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे हे होते. तर उद्घाटक म्हणून राज्यसभा खा. डॉ. अजित गोपछड़े, आ. राजेश पवार, माजी आ. अमरनाथ राजूकरकर, महापौर कविता मुळे, माजी सभापती व्यंकटराव पाटील चांडोळकर, संतोष पांडागळे, नव्यानेच आयएएस अधिकारी झालेले ऋषिकेश पालीमकर, महोत्सव समितीचे अध्यक्ष सोपानराव मारकवाड, कार्याध्यक्ष अनिल पाटील निमटेककर, ‘शिवा’चे राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, राज्य प्रवक्ते विठ्ठलराव ताकबिरे, राज्य सरचिटणीस संजय कोठाळे, जिल्हा संपर्कप्रमुख इंजि. अनिल माळगे, मराठवाडा अध्यक्ष अर्जुन सैदाने, सरचिटणीस प्रा. किसन ईमडे, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष संजय कळने, मराठवाडा अध्यक्ष वीरभद्र बसापुरे, उपाध्यक्ष दिगंबर मांजरमकर, मराठवाडा संघटक डॉ. वैजनाथ हंगरगे, नगरसेवक वैजनाथ देशमुख, मयुर नळदकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना प्रा. मनोहर धोंडे म्हणाले की, बस्वकल्याण येथील महात्मा बसवेश्वराच्या मूळ अनुभव मंडप व परसु कट्टा निजामाच्या खासगी मालकीत असून त्याची मुक्तता करणे व महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती देशभर करणे या प्रमुख मागण्यांसाठी लवकरच दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर शिवा संघटनेच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. असे सांगतानाच शिवा संघटना ही जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. 
यावेळी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी शिवा संघटनेच्या कार्याचे कौतुक करताना प्रा. मनोहर धोंडे व त्यांच्या टीमने लोकांच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून दिले असून आपण सुद्धा एक समाजघटक म्हणून खासदार झाल्यापासून वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी विविध योजना खेचून आणल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी स्वागताध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी आपल्या भाषणातून महात्मा बसवेश्वरांच्या कार्याला उजाळा देताना 12 व्या शतकात आंतरजातीय विवाह घडवून आणणाऱ्या महात्मा बसवेश्वरांनी त्याच काळात लोकशाहीचा पाया रचला  व त्यात महिलांना आरक्षण दिले. परंतु, आता मात्र, याच आरक्षणासाठी नरेंद्र मोदी सरकार संघर्ष करत आहे. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी महिलांना आरक्षण देण्यास भाजप कटिबद्ध आहे. 
यावेळी आ. राजेश पवार, महपौर सौ. कविताताई मुळे, संतोष पांडागळे, अनिल पाटील निमटेककर ऋषिकेश पालीमकर यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव ताकबिडे यांनी केले. तर सूत्रसंचलन संजय कोठाळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंजि. अनिल माळगे, जिल्हाध्यक्ष विलास कापसे, संभाजी पाटील लोहगावकर, रवींद्र पांडागळे, शुभम घोडगे, महानगराध्यक्ष गजानन कानडे, सौ. नंदा पाटील. सौ. सत्यभामा येसगे, शिवराज उमाटे, सिद्धेश्वर स्वामी, नंदू देवणे, सतीश मठपती, शिवकुमार देशमुख, ज्ञानोबा घोडके, प्रा. रामकिसन पालीमकर, नीळकंठ चौंडे, दत्तप्रसाद पांडागळे, नागोराव पाटणे, गणेश स्वामी, संग्राम काडवदे, आनंदराव कंधारे, वसंत जारीकोटे, ज्ञानोबा डोरले यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या