ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचे निधन


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/25/2020 3:32:10 PM   प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती.  मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. 

उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला होता.

Share

Other News