नांदेड :- नुकत्याच पार पडलेल्या मनपा सार्वत्रिक निवडणूकी नंतर महापालिकेच्या कामाजाचा आढावा घेण्यासाठी *महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खा.अशोक चव्हाण* यांनी गुरुवारी दि.२२.०१.२०२६ रोजी महापालिका मुख्यालयास भेट दिली. महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतांना शहरातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करुन १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्याचे निर्देश यावेळी *खा.अशोक चव्हाण* यांनी *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* व इतर अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस विधानपरिषद आ.अमर राजुरकर, भारतीय जनता पार्टीचे चैतन्यबापु देशमुख व दिलीप कंदकुर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील वाहतुक नियोजनासह बंद अवस्थेत असलेले सी.सी.टी.व्ही.कॅमेरे कार्यान्वित करावेत. शहर बस सेवेसाठी इलेक्ट्रीक बसेसचा प्रस्ताव तयार करणे, नवि दिल्ली व मुंबईच्या धर्तीवर इंनडोअर स्टेडीयम उभारणे, पार्कींग व्यवस्था सुधारणेसाठी मल्टी फ्लेअर पार्कींगची निर्मीती, स्टेडीयम परिसरात खाऊ गल्लीची निर्मीती, मुंबई प्रमाणे नांदेड शहरात एक मोठी सेंट्रल लाईब्ररीची उभारणी इत्यादी भविष्यात उभारावयाच्या प्रकल्पासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांसमवेत *खा.अशोक चव्हाण* यांनी बैठकी दरम्यान चर्चा केली.
त्याचप्रमाणे गोदावरी नदी शुध्दीकरण प्रकल्प, नदी घाट परिसरातील नविन रस्ते इत्यादींचा आढावा घेतांना आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरणार नाही याची दक्षता घेऊन पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे, शहरातील धोकादायक विद्युत वाहीनी भुमिगत करणे, नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे काढुन टाकुन पाण्याचा निचरा सुस्थितीत करणे, नागरीकांना जास्तीत जास्त सेवा ह्या ऑनलाईन स्वरुपात मिळाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे पालिकेच्या जमितीनीवरील वस्त्यांना नियमीत करणे, महानगरपालिकांचे दवाखाने अद्यावत करणे, शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे निष्कासित करणे, शहर स्वच्छता चोख पध्दतीने करुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी ही दक्षिण नांदेड व उत्तर नांदेड अशा दोन ठिकाणी झाली पाहिजे, शहरात हॉकर्स झोन निर्माण करावेत, महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे, शहर विकास आराखड्याची पुढील दिशा ठरविणे आवश्यक असुन १०० दिवसांचा कृती आरखडा राबवुन पालिकेने प्रलंबित विषय मार्गी लावुन दैनंदिन कामकाज गतिमान करावे अशा सुचना यावेळी *खा.अशोक चव्हाण* यांनी बैठकीदरम्यान दिल्या.
या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, उपायुक्त नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील, नगररचनाकार ओम लहाने, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, शिक्षणधिकारी नागराज बनसोडे, उपअभियंता सतीश ढवळे, अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, कनिष्ठ अभियंता राजकुमार बोडके व रविंद्र सरपाते आदींची उपस्थिती होती.