राकेश दडुणावर यांनी आव्हान केल्याप्रमाणे या रॅलीमध्ये कृष्णा नदीवर प्रेम करणारे पर्यावरणवादी विचारांचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा,श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे नितीन चौगुले, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, इन्साफ फाउंडेशनचे आरोग्यसेवक देवदूत मुस्तफा मुजावर यांच्यासह जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक, शासकीय अधिकारी तसेच अनेक स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
नुकतेच यशस्वी झालेल्या चांद्रयान अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले सांगलीचे सुपुत्र, आपले समूह सदस्य संदीप सोले यांच्या सुविद्य पत्नी अंजली सोले ऑक्सीजन युनिटसह या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. जिद्दी आणि सकारात्मक विचाराच्या अंजली सोले मॅडम रॅलीमधील आकर्षणाच्या केंद्रबिंदू बनल्या होत्या.
कृष्णामाई स्वच्छता अभियान सांगलीचा युवा स्वच्छता दूत सांगली भूषण पुरस्कार प्राप्त राकेशने उचललेले पाऊल आणि सर्व सांगलीकरांनी दिलेला प्रतिसाद खूप आशादायक वाटला नक्कीच पुढील काळात ही मोहीम यशस्वी होईल, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.