लाँयन्स क्लब सेंट्रल तर्फे कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालयात होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/08/2024 6:28 PM

नांदेड :- येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित कै. नाना पालकर प्रा विद्यालयात लाँयन्स क्लब सेंट्रल नांदेड  यांच्यातर्फे मोफत गणवेश  आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 
          लाँयन्स क्लब  यांच्या तर्फे   अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून कै. नाना पालकर प्रा विद्यालयाच्या होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी भारतमाता आणि  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहिल्याबाईंचे हे त्रीजन्मशताब्दी वर्ष असल्याने अहिल्याबाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे सांघिक गीत प्रारंभी  विद्यार्थ्यांनी सादर केले.  
        त्यानंतर विद्यालयातील पन्नास होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना योजना विभागाचे शिक्षणाधिकारी  दिलीप बनसोडे यांनी बोलताना कै. नाना पालकर प्राथमिक विद्यालय हे नांदेड शहरातील भारतीय संस्कार देणारे   विद्यालय आहे. लायन्स क्लब ने गणवेश वाटपासाठी योग्य  निवड केली त्याबद्दल लायन्स क्लब चे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ कल्पना कांबळे यांनी करताना लाँयन्स क्लब हे  समाजातील खऱ्या  गरजुंपर्यंत मदत पोहोचवणारे क्लब असून  त्यांचे कार्य  हे आदर्श आहे असे प्रतिपादन केले. 
           लाँयन्स क्लब चे रिजनल चेअरपर्सन  श्री रवि कडगे यांनी कै. नाना पालकर ही संस्कार देणारी मराठी माध्यमाची आदर्श शाळा असून  सर्वतोपरी मदतीचे  आश्वासन दिले. 
        अध्यक्षीय समारोप करताना भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई शाखा नांदेडचे अध्यक्ष डॉ मापारे यांनी  लाँयन्स क्लब चे विशेष धन्यवाद दिले. 
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ देशपांडे यांनी केले तर आभार सौ. सोनटक्के यांनी मानले. वैयक्तिक गीत इ.आठवीची  कु. आनंदी जोशी हिने सादर केले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी लायन्स नांदेड सेंट्रलचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी पाटील, झोन चेअरपर्सन शिवकांत शिंदे  तसेच सचिव गौरव दंडवते, कोषाध्यक्ष दीपेश छेडा आणि प्रकल्प अधिकारी प्रवीण जोशी यांनी परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या