गडचिरोली दि.२२ : नैसर्गिक आपत्तीने वेगवेगळ्या घटनेत मृत झालेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकाच्या वारसांना प्रत्येकी ४ लक्ष असे एकूण १२ लक्ष रुपये मदतीचे धनादेश आज त्यांच्या घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
याच महिन्यात दिनांक ९ जुलै रोजी तोडसा येथे पुराच्या पाण्यामध्ये वाहून मयत झालेले अमित डोलू तीम्मा यांचे वारस वडील श्री दोलू लुला तीम्मा यांना, २ जुलै रोजी मौजा जीवनगट्टा येथील श्री. चंदू गिरमा पोरटेत हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते, त्याचे वारस पत्नी नामे प्रेमीला चंदू पोरतेट यांना तसेच मौजा मरपल्ली येथील श्री. अंकुश पांडू कुळयेटी हे दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मरपल्ली नाल्या जवळ पाण्यात पडुन वाहून जाऊन मृत झाले होते. त्यांचे वारस आई नामे सुमन पांडू कुळयेटी यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आले.
यावेळी श्री आदित्य आंधळे गटविकास अधिकारी , श्री . सचिन कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी , श्री पी. एन . उसेंडी तलाठी एटपल्ली , श्री . पी . डी. आत्राम तलाठी तोडसा ,श्री . देवाजी गावडे कोतवाल , श्री. सुरेश दुर्गे कोतवाल , श्री सचिन गेडाम कोतवाल उपस्थित होते.
०००