*एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून गावोगावी होणार अनुसूचित जातीच्या योजनांची जनजागृती*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 10/02/2024 5:16 PM


आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)

सातारा दि.:  राज्य शासनामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, सातारा यांच्यावतीने एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्तींमध्ये जावून जनजागृती करणार आहेत. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मोबाईल एलईडी व्हॅनची फित जिल्हा जाती पडताळणी समितीच्या उपायुक्त स्वाती इथापे यांनी फित कापून व समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून व्हॅन मार्गस्त केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून  सातारा तालुक्यातील सातारा शहर, वनवासवाडी, धनगरवाडी, अतित, कोंढवे, काशिळ, देगाव, शेंद्रे, नागठाणे व अपशिंगे. फलटण तालुक्यातील फलटण, सांगवी, गुणवरे, विडणी, आसू, जिंती, मंजुवडी, सरडे, गोखळी, निंबळक, गिरवी, सोनगाव, पवारवाडी, राजुरी, तरडगाव. माण तालुक्यातील दहिवडी, म्हसवड, पळशी, राणंद, वरकुटे मलवडी, वावरहिरे, बिदाल, हिंगणी व गोंदवले बु.
खटाव तालुक्यातील वडूज, मायणी, खटाव, औंध, पुसेगाव, कुरोली, कलेढोण, बुध, पुसेसावळी. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव, रहिमतपूर, सातारा रोड (पाडळी), वाठार स्टेशन, पिंपोडे बु, चिमणगाव, कुमठे, वाठार किरोली, आर्वी. कराड तालुक्यातील कराड, रेठरे बु,, काले, बनवडी, मसूर, वारुंजी, गोळेश्वर, मुंढे, विरवडे, कालवडे, खोडशी व उंब्रज.
पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक, पाटण, मल्हारपेठ, तारळे, नाटोशी, चाफळ, मंद्रुळकोळे, नाडे, मरळी. वाई तालुक्यातील वाई, यशवंतरनगर, बावधन, भुईंज, ओझर्डे, पसरणी, कवठे, पाचवड, किकली. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी, दांडेघर, भिलार, खिंगर, जावळी तालुक्यातील मेढा, कुडाळ, रायगाव, हुमगाव व बिभवी, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, खंडाळा, अंदोरी, भादे, पाडेगाव, खेड बु., बावडा, वाठार बुं., व विंग अशा एकूण 100 गावांमध्ये एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून 29 फेब्रुवारीपर्यंत जनजागृती करण्यात येणार आहे. याचा अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवानही श्री. उबाळे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या