ब्रिटिशकालिन महारवतनी जमिनींची खरेदी विक्री थांबवून सरकारने मुळमालकांना परत द्यावी, रोहिदास भालेराव यांचे निवेदन

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 10/02/2024 1:56 PM

ब्रिटिशकालिन महारवतनी जमिनींची खरेदी विक्री थांबवून सरकारने मुळमालकांना परत द्यावी(निवेदन)
भगूर(वार्ताहर)ब्रिटीशकालिन सरकारने तत्कालीन वेळी बहाल केलेल्या महारइनामी वतनदारीने दिलेल्या
जमिनिंची खरेदी विक्री थांबवून मुळ मालकांना परत देऊन सदर जमिनी बाबत माहिती मिळावी मागणीचे
निवेदन लहवित येथील सामाजिक कार्यकर्ते रोहिदास
भालेराव सह कार्यकर्तेनी निवासी उपजिल्हाधिकारी
मा.राजेंद्र वाघ यांना शुक्रवारी दिनांक.९ रोजी दिले
 निवेदनात म्हटले की ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीत
ज्या महार लोकांनी पहारेकरी शिपाई पदावर सेवा केली अशा लोकांना उपजिवेकरीता बक्षीस म्हणून जमिनी दिल्या होत्या त्या प्रत्येक गावोगावी अस्तित्वात
होत्या व आहेत परंतु इतर शेतकऱ्यांनी अशिक्षित व
अज्ञानामुळे महारांच्या वतीने जमिनी बळकाविल्या तर
बर्याच ठिकाणी मशागत नात्याने कुळाने या जमिनी हस्तगत केल्या अनेक महार कुटुंबिय भुमीहिन झाले तरी विद्यमान शासनाने महार वतनाचे जमिनीचे खरेदी
विक्री व्यवहार थांबवावे  जमिनीवर शासन दरबारी व
तालुका निहाय पोलिस ठाण्यात सदन लोकांच्याच
बाजुने निर्णय देऊन दलितांवर अन्यथा केला जात असून तो थांबवावा आणि जर ब्रिटिश सरकारने महार
वतन जमिनी दिल्या त्यावेळी बक्षीसपत्रात ज्याअटी व 
शर्ती असतील त्याची माहिती मिळत नसुन वाच्यता होत नाही करीता दलित समाजाच्या गरीब वयोवृद्ध
यांना शासन सवलतींचा लाभ मिळत नाही बेरोजगार युवकांना सरकारी नोकरी मिळत नाही करीता महार इनाम वतनदारीने दिलेल्या जमिनी बाबत माहिती मिळावी असेही शेवटी निवेदनात नमुद केले असुन
निवेदनावर प्रमुख सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मेसु
भालेराव(लहवित) संतोष वामनराव भवार(नानेगाव)
शाम एकनाथ उन्हवणे(वडनेर दुमाला) बाळासाहेब नामदेव निरभवणे(राहुरी) बाळु तुळशीराम गायकवाड
(लहवित) इंद्रपाल शिवराम रुपवते(हिवरेपिपंळे) सुकदेव रंभा जाधव(पिंपळगाव डुकरा) अशोक हरी शेजवळ(चांदवड)यशवंत मोगल भालेराव(लहवित)
बाळकृष्ण सखाराम चंद्रमोरे(पळसे) संजय रामचंद्र सोनवणे(त्रंबकेश्वर)निलेश अशोक भालेराव( सागवी)
भाग्योदय संतोष गायकवाड व योगेश चंदु गायकवाड
दशरथ रघु जाधव( लहवित)यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
फोटो :- नाशिक उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना
निवेदन देतांना रोहिदास भालेराव आणि सहकारी

Share

Other News

ताज्या बातम्या