जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथे संविधान दिन साजरा

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 28/11/2023 6:00 PM गडचिरोली,(जिमाका)दि.28:आपल्या भारत देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी देशाच्या संविधान सभेने सद्याची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र "संविधान दिन" साजरा केला जातो. भारतातील विविध धर्म आणि जातीच्या लोकांना एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवलेले आहेत. या संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, संसद, राज्य विधीमंडळ, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये त्याअंतर्गत काम करतात. शिवाय, याच संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र आणि समानतेने जीवन जगतो. देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मुल्यांकन आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मुळ उद्देश आहे. 
संविधान दिनानिमित्त जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील प्रांगणात प्रास्ताविकेचे वाचनाचा कार्यक्रमाचे आयोजन आर. आर. पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे वतिने सकाळी १०.३० वाजता करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून यु. एम. मुधोळकर, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवाप्राधिकरण, गडचिरोली तसेच कार्यक्रमास उपस्थित एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधिश(व. स्तर) तथा मुख्यन्यायदंडाधिकारी, गडचिरोली, सी. पी. रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधिश(क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली, आर. आर. खामतकर, व्दितीय सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली, श्रीमती एन.सी. सोरते, तृतीय सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली, श्रीमती एन. ए. पठाण, अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली, 
संविधान दिनानिमित्त आयोजित प्रास्ताविकेचे वाचनाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी उपस्थितांना संविधानाने आपल्याला काही मुलभूत अधिकार दिलेले आहेत तसेच आपल्याला कर्तव्ये सुध्दा दिलेली आहेत.भारतीय संविधानाने दिलेल्या एकुण 11 कर्तव्यांची संपूर्ण माहिती यावेळी उपस्थितांना दिली आणि उपस्थितांना आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक असतो त्याचप्रमाणे संविधानाने नेमूण दिलेल्या कर्तव्यांचे सुध्दा आपण काटेकोरपणे पालन करावे असे प्रतिपादन केले. त्यानंतर श्रीमती एन. सी. सोरते, तृतीय सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली, यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले आणि त्यांच्या पाठोपाठ उपस्थितांनी प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाकरीता जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील कर्मचारी वृंद तसेच परिक्षार्थी, विधी स्वयंसेवक / स्वयंसेविका, लोकअभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोकअभिरक्षक  एस. एस. भट,  वाय. एन. चेके, कु. एस. के. मेश्राम सहाय्यक लोक अभिरक्षक, लोक अभिरक्षक कार्यालय, गडचिरोली असे बहुसंख्येने उपस्थित होते. 
संविधान दिनानिमित्त प्रास्ताविकेचे वाचनाचे कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे  पी. व्ही. संतोषवार, अधिक्षक,  एन. आर. भलमे, वरीष्ठ लिपीक,  एम. डी. गुरनूले, एस. एन.आळे,  एस.के.चुधरी,  जे. एम. भोयर,  एच. एम. गायमुखे, कनिष्ठ लिपीक,  निखील बुरांडे, लेखापाल, श्रीमती शितल शेबे, रिसेप्शनिष्ट कम डाटा एन्ट्री ऑपरेटर,  एस. डब्ल्यु. वासेकर,  सागर नंदावार, शिपाई श्रीमती शिल्पा धोंगडे, शिपाई यांनी अथक परिश्रम घेतले. असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या