हजारो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळला गोदावरीचा परिसर:बाविसावे गोदावरी गंगापुजन उत्साहात संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/11/2023 2:19 PM

नांदेड : त्रिपुरारी  पौर्णिमेनिमित्त भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी २२ व्या वर्षी आयोजित केलेल्या गोदावरी गंगापूजन मध्ये शेकडो महिलांनी हजारो दिवे नदीपात्रात सोडल्यामुळे उजळून निघालेल्या नगीनाघाट चा परिसरातील दीपोत्सव पाण्यासाठी नांदेडकरांनी प्रचंड गर्दी केली.
हजारो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळलेला गोदावरीचा परिसर,त्यावर सप्तरंगी रांगोळ्यांचा गालिचा, फटाक्यांची आतिषबाजी आणि हिरव्या साड्या परिधान केलेल्या शेकडो  महिलांच्या उपस्थितीमुळे यावर्षीचे गोदावरी गंगापूजन रंगतदार ठरले.भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ . संतुकराव हंबर्डे, हैदराबाद येथील ज्येष्ठ समाजसेविका स्नेहलता जायसवाल ,लंगर साहब गुरुद्वाराचे मोर बाबा, लायन्स अध्यक्ष ॲड.उमेश मेगदे, ज्येष्ठ पत्रकार  शंतनु डोईफोडे, साक्षी रजत जायस्वाल यांच्या हस्ते गोदावरी नदीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून पुरातन काळापासून असलेले गंगा आरतीचे महत्त्व विशद करून लवकरच मायेची ऊब  उपक्रमांतर्गत नांदेड शहरात मध्यरात्री फिरून २०२४ ब्लॅंकेट लोकसहभागातून वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,  अमरनाथ यात्री संघाच्या वतीने आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठित व्यापारी योगेश जायस्वाल यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे पाच हजार द्रौण, दिवे व फुलांची व्यवस्था करण्यात आली.संतोषगुरु परळीकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा सांगितली. सालासर भजनी मंडळाच्या  सदस्यांनी सवाद्य पाच आरत्या गायल्या. पाच वाजता  वेळेवर आलेल्या व शिस्तीत बसलेल्या १००० महिलांना ओम तापडिया,शिवा शिंदे, सदाशिव पाटील, सुनील साबू, गौरव दंडवते,लक्ष्मण संगेवार, उमाकांत जोशी यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.उत्कृष्ट पूजेची थाळी सजवून आणलेल्या २१ महिलांची निवड स्नेहलता जयस्वाल, शांता काबरा व प्रणिता भालके यांनी केली. त्यामध्ये संध्या कोटगिरे, सुप्रभा रणवीरकर, सुलभा कुरुडे ,अपर्णा पाटील, सायली कोटगिरे, महानंदा माळगे,सुनंदा घोरबांड, सुनिता शिखरे, संपदा पाटील, डॉ. निर्मला कोरे,साक्षी जवादवार, महानंदा देवणे, संगीता पोलशेपवार, दीपा वाधवानी, संगीता दावडा, ज्योती ओझा, प्रतिभा वैद्य,प्रीती चव्हाण यांचा समावेश आहे.  विजेत्या महिलांना माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, विमल शेट्टी,सविता काबरा, ज्योती नगारे, संध्या छापरवाल, निलिमा भयानी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कौन बनेगा विश्व विजेता या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या मोहिनी पाटनूरकर यांच्यासह इतर नऊ स्पर्धकांना डॉ.सचिन उमरेकर,गोविंद नांदेडे, रजत जायस्वाल,दीपक मोरताळे,जयंतीलाल पटेल,अमर शिखरे पाटील ,अरुणा कुलकर्णी, डॉ.जयस्वाल ,संतोष जानापुरीकर यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली.संस्कार भारती तर्फे काढण्यात आलेल्या भव्य रांगोळी सोबत अनेकांनी सेल्फी काढल्या. भाऊ ट्रॅव्हल्स व माय हॉलिडेज द्वारे आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या आठ सहलीत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंचा शिरोपाव व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. नांदेडच्या गंगापूजनाची महती देश पातळीवर पोहोचवणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचलन सुरेश लोट, अरुणकुमार काबरा, सुभाष पाटील, कामाजी सरोदे यांनी केले.मावळत्या सूर्याला अर्ध वाहून  परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी महिलांनी गोदावरी पात्रात दिवे सोडले.हे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नगीनाघाट वर प्रचंड गर्दी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन प्रमुख बेग यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सुभाष कुकडे व इतर जीव रक्षकांनी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी नदीपात्रात चोख कामगिरी बजावली. माजी विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, मनपा विद्युत अभियंता ढवळे, कनिष्ठ अभियंता शकील, लाईनमन झहीर शेख यांच्यामुळे संपूर्ण परिसरात प्रकाश व्यवस्था उत्तम होती. वजीराबाद पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता. गोदावरी गंगा पूजनाचा सुभाष देवकत्ते, धोंडोपंत पोपशेटवार, दत्तात्रय कोळेकर,डॉ.सतीश चव्हाण यांच्यासह अनेकांनी हा नयनमनोहर सोहळा अनुभवला. अर्चना शर्मा, शुभांगी देबडवार,सुरेखा चौहाण, गायत्री टपके, रत्नप्रभा गोपूलवाड, शोभा चौहाण, निलिमा अवधिया, नंदा चौहाण, नयना गिरगावकर यांच्यासह शेकडो महिलांनी हिरव्या साड्या परिधान केल्यामुळे नगीना घाट परिसर हिरवागार दिसत होता.कार्यक्रम संपल्यानंतर गुरूद्वारा लंगरसाहब तर्फे ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा सर्वानी लाभ घेतला.गोदावरी गंगापुजन यशस्वी करण्यासाठी जगतसिंग ठाकूर,सुरेश शर्मा, नरेश आलमचंदानी ,विनायक कांबळे,संतोष बच्चेवार, राजेश यादव, रुपेश व्यास, अविनाश भयानी,लहू गोसावी,संतोष भारती, कपिल यादव,
 यांनी परिश्रम घेतले.दुसऱ्या दिवशी  महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नगीना घाट परिसर स्वच्छ केला. हरिद्वार व वाराणसी नंतर भव्य प्रमाणात नांदेड येथे होणाऱ्या गंगेच्या आरतीचे सतत २२ वर्ष आयोजन करीत असल्याबाबत दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या