(विजय जगदाळे )
वडूज दि: सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सामाजिक अभिसरण व राजकीय डावपेच सुरू झाले आहेत . तरी ही बहुजन समाजातील वंचित घटकांनी एकमेकांबद्दल आदर युक्त करण्यासाठी वडूज ता. खटाव येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक प्रतिनिधी स्वरूपात बैठक झाली.
या बैठकीला मनसेचे जिल्हा सरचिटणीस सुरज लोहार, विशाल गोडसे, सचिन खुडे, हिमत पाटोळे, उस्मान सैयद , जनार्दन टेंगरे ,मन्सूर खोत, अमोल गंगावणे व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त हुतात्मे पत्करणारे वडूज नगरीची भूमी आहे. या ठिकाणी समतेचा विचार पेरला गेलेला आहे. त्यामुळे कधीही जातीयवाद व जातीय तणाव निर्माण झालेला नाही. सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी वडूजची भूमी आहे. या भूमीचे पवित्र राखण्याची जबाबदारी सर्वच समाजातील प्रतिष्ठित व वैचारिक भूमिका घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळेच राजकारण बाजूला ठेवून फक्त मैत्रीभाव वाढवण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामंजस्य व समविचारी लोकांशी हितगुज साधण्याचा प्रयत्न ज्येष्ठ मार्गदर्शक बाळकृष्ण देसाई करत आहेत. आपला लढा हा लोकशाही मार्गाने यशस्वीपणे करण्याचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. या अधिकाऱ्याची कुठेही पायमल्ली झाली नाही पाहिजे. याची आता काळजी घ्यावी .यासाठीच वैचारिक मंथन होत आहे.
आज खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील युवा पिढी जात धर्मापेक्षाही मैत्रीपूर्ण संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही आनंदाची बाब आहे. प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान आहे. आणि तो निश्चितच असावा. परंतु, इतर धर्मियांना कमी लेखू नये. ही शिकवण फुले- शाहू- आंबेडकर विचाराने दिलेली आहे .याचं भान ठेवणाऱ्या अशा भूमीला वंदन करण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई हे सामान्य कुटुंबातील सदस्य यांच्याशी संपर्क ठेवत आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नसून राजकारणापेक्षाही माणूस महत्त्वाचा आहे. म्हणून हे अभियान माणसांसाठी आहे. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या तरुणांनी आपल्या पोस्टमुळे इतरांच्या भावना दुखवू नये. यासाठी काळजी घेतली पाहिजे. कारण एखादी चांगली गोष्ट घडवण्यासाठी अनेक वर्ष लागतात पण ते बिघडवण्यासाठी एक संदेश पुरेसा आहे .याची झळ सर्व समाजाला बसत असते. निरपराधी लोकांना लाठीमार व अन्याय सहन करावा लागतो. असं किमान वडूज नगरीत घडणार नाही. त्यामुळे जेष्ठ व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सर्वांनीच या नव पिढीला मार्गदर्शन करताना अनावधनाने काही चुका झाल्यास त्याला समजून सांगावे. असे श्री बाळकृष्ण देसाई यांनी सांगितले.
-----------------------------------------------
फोटो -- वडूज नगरीत सामान्य तरुणांशी संवाद साधताना श्री बाळकृष्ण देसाई