येवली प्राथमिक आरोग्य पथकाच्या कर्मचारी वर्गाला कार्यालय वेळेचा विसर मागील 2 महिन्यापासून सुरु आहे सदर प्रकार

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 04/08/2020 1:10 PM

येवली :- गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अगदी 12 किमी अंतरावर असलेल्या येवली प्राथमिक आरोग्य पथकाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला कार्यालयीन वेळेचा विसर पडल्याचा प्रकार मागील 2 महिन्यासून सुरू आहे. नागरिकांनी वारंवार या प्रकाराची तक्रार संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे केली असून सुद्धा सदर प्रकाराकडे अधिकारी व कर्मचारी कानाडोळा करत असून रुग्णांसोबत रेरावी ची भाषा वापरली जात आहे.
         आज भारतीय माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा समन्वयक मिनार खोब्रागडे यांनी प्राथमिक आरोग्य पथकाला भेट दिली असता सदर प्रकार उघडकीस आला.नवीन वैद्यकीय अधिकारी यांनी पदभार सांभाळून  साधारणतः दीड महिना होत असून सुद्धा त्यांनी अजून पर्यन्त योग्य प्रकारे येवली प्राथमिक आरोग्य पथकाची धुरा न संभाळल्याचे निदर्शनास येत आहे.उत्तम स्थितीतील राहण्याची व्यवस्था येवली प्राथमिक आरोग्य प्रथकाच्या परिसरात असून सुद्धा वैद्यकीय अधिकारी येवली येथे उपस्थित न राहता गडचिरोली वरून दररोज ये-जा करतात आणि त्यामुळे योग्य कार्यालयीन वेळेवर हजर राहत नाही.सदर प्रकारामुळे लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचा प्रकार सध्या येवली परिसरात सुरू आहे.अधिकारी आणि कर्मचारी यांना संबंधित प्रकाराविषयी विचारणा केली असता उडवाउडवीची तसेच उद्धट भाषेत उत्तरे दिली जातात.
      जिल्हा मुख्यालायपासून 12 किमी अंतरावर असलेल्या गावात सदर प्रकार सुरू असून दुर्गम भागात काय अवस्था हे यावरून अधोरेखित होते.सदर प्रकारात जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हाधिकारी  गडचिरोली काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मिनार खोब्रागडे
9561266017

Share

Other News

ताज्या बातम्या