*अमृत महोत्सवी वर्षात भाजपला त्यांची जागा दाखवू* *खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 13/08/2022 10:45 PM

🇮🇳 अमृत महोत्सवी वर्षात भाजपला त्यांची जागा दाखवू*

🔳 खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन*

चंद्रपूर : 2022 पासून संपूर्ण देशामध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने काँग्रेसच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. केंद्रातील मोदी सरकार हे लुटारू सरकार असून, 2024 च्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आजादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. नऊ ऑगस्ट पासून निघालेली ही यात्रा आज 13 ऑगस्ट रोजी वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहचली. यावेळी संबोधित करताना खासदार बाळू धानोरकर बोलत होते.

आजादी गौरव पदयात्रा भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास आणि भारताच्या जडणघडणीतील काँग्रेसचे योगदान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने काँग्रेसतर्फे निघालेली आजादी गौरव पदयात्रा उद्या दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.00 वाजेपासून शेगाव - खेमजई - टेमुर्डा- येन्सा- वरोरा जाजू हॉस्पिटल ते गांधी चौक - नंदोरी आंबेडकर चौक भद्रावती या मार्गे वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्रात दाखल झाली.

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर ,शहराध्यक्ष विलास टिपले, भद्रावती तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत काळे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजू चिकटे, भद्रावती शहराध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, राजू महाजन प्रदीप बुराण, अनिल झोटींग, सविता सूर,रत्नमाला अहिरकर, दिपाली माटे,सुनंदा जिवतोडे, सूरज गावंडे, विनयबोधी डाेंगरे, प्रशांत काळे, सरिता सूर, वर्षा ठाकरे, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, दातारकर ताई, निमकर ताई, गेडाम ताई, ढुमणे ताई, निखील राऊत, अक्षय बोंडे, गितेश सातपुते, सुधीर खोब्रागडे, सुधीर पारखी, विवेक आकोजवार, रवींद्र धोपटे, वसंतराव विधाते, गिरीधरजी विजय कष्टी, माधव कोटकर, विजय आत्राम, विकास डांगरे, विशाल बदखल, मयूर विरुटकर, सुरेश टेकाम, चंद्रासजी मोरे,  रमेश चुधरी, अरुण बरडे, लक्ष्मण बैस, वाघ गुरुजी, लभाने ताई, देवानंद मोरे, त्रिशूल निबुधे, करण भुसारी, राहुल, पवन मेधराम, गणेश काळे, विजय खिरटकर, अविनाश पायघन आदींची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या