ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 5/23/2022 10:03:42 PM

गडचिरोली, दि.23:प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास,प्रकल्प भामरागड जि.गडचिरोली अंतर्गत व एटापल्ली तालुक्यातील अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार  पोष्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती संबंधी महाडिबीटी पोर्टलच्या सन 2020-21  व सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षामधील प्रलंबित अर्ज  निकाली काढण्याकरीता दिनांक 31 मे 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच 9 मे 2022 अन्वये महाविद्यालययातील प्राचार्य यांना सुध्दा कळविण्यात आले आहेत.तरी  या प्रकल्प कार्यालय,भामरागड अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी  सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील प्रलंबीत असलेले अर्ज महाडिबीटी पोर्टल द्वारे शिष्यवृत्तीचे अर्ज दिनांक 31 मे 2022 पर्यत महाविद्यालयस्तरावर सादर करण्यात यावे. असे  आवाहन सहा. प्रकल्प अधिकारी  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड यांनी आहे.

Share

Other News