ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

* सांगली शहराला सध्या काम चालू असलेल्या राज्यमार्गाची "कनेक्टीव्हीटी" आवश्यक...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/27/2021 3:11:07 PM


       
प्रति,
मा.ना.जयंतरावजी पाटील 
पालकमंत्री,सांगली 
                      
                      विषय- सांगली ते विटा,सांगली ते अंकली,सांगली ते इस्लामपूर व 
                                  पाचवा मैल ते शिवशंभो  चौक रस्ता सांगली शहराला राष्ट्रीय 
                                  महामार्गास जोडणेबाबत.
महोदय,
          सांगली शहराचे दुर्दव किती आहे.सांगली शहराला जोडणारे सर्वच प्रमुख रस्त्यांची अवस्था खुप दयनीय झाली आहे.सांगली ते इस्लामपुर रस्त्यावर खड्याचे साम्राज्य आहे,रस्त्यावर खड्डे आहेत,की खड्यात रस्ता आहे हेच समजत नाही.या रस्त्याबाबत वेळोवेळी सामाजिक आणि राजकीय संघटनाकडून आदोलन करण्यात अली आहेत,परंतु अजून हि या रस्त्याची दुरवस्था तशीच आहे.
        त्याचप्रमाणे सांगली ते अंकली रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे.आज पर्यंत हजारो जनाचे अपघात झालेने हजारो जीव गेले आहेत,तरी राज्य सरकारला याची पर्वा नाही.हा रस्ता राज्य शासनाचा आहे का राष्ट्रीय महामार्ग यांचा आहे याबाबतचा वाद प्रशासकीय पातळीवर अजून मिटला नाही.
         नागपूर-रत्नागिरी हायवेमुळे मिरज ते सोलापूर पर्यंत या रस्त्याचे नशीब उघडले आहे.तेवढच मिरजकरांच नशीब उघडल आहे.परंतु सांगली-मिरज रस्त्याला पर्यायी  रस्त्याची भविष्यात गरज भासणार आहे.याकडेपण प्रामुख्याने लक्ष्य देणे गरजेचे आहे.
          त्याचप्रमाणे सांगली पलूस रस्ता सुद्धा अश्याच पद्धतीने बोळ रस्ता झालेला आहे.त्यासाठी गुहागर-विजापूर हायवे पाचव्या मैलाहून गेलेला आहे.पाचवामैल ते शिव शंभो चौक पर्यंतचा रस्ता पुर्ण क्षमतेने केल्यास  दोन राष्ट्रीय महामार्गा एकमेकास जोडले जातील. 
         सांगली ते विटा या रस्त्याची अवस्था  गल्लीतील बोळा प्रमाणे अवस्था झाली आहे,सांगली ते कवलापूर पर्यंत प्रवास करताना जीव मुठीत धरून करावा लागतो.संध्याकाळच्या वेळेत माधवनगर बाजार पेठेतुन जात असताना तारेवरची कसरत करावी लागते. भविष्यात  शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र विद्यार्थ्यांच्या सोईसाठी खानापूर येथे होऊ घातले परंतु त्याला जाणाऱ्या रस्त्यांची अशी  अवस्था असेल  तर त्या उपकेंद्राचा काय उपयोग आहे.
         सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना राष्ट्रीय महामार्गास जोडले गेले आहेत.मात्र जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी असलेल्या सांगली शहराला अद्यापही कोणत्याही राष्ट्रीय महामार्गास झोडलेली नाही त्यामुळे सांगलीचा विकास व दळणवळण खुंटले आहे.
          सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकाससाठी आपल्या पुढाकाराने सांगली जिल्ह्यामधील सर्व पक्षीय खासदार व आमदार यांना घेऊन केंद्रीय मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी यांच्या सोबत वरील विषयासाठी बैठक आयोजित करून त्यासाठी लागणारा आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा.व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सांगली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत हि नम्र विनंती 
       
                                                                             
                                                                             

                                                                                     सतिश साखळकर.आनंद देसाई
                                                                                        नागरिक जागृती मंच,सांगली

Share

Other News