ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये दर शनिवारी दिव्यंगाना लस


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 6/10/2021 7:34:27 PM

कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये दर शनिवारी दिव्यंगाना लस

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता,कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये दर शनिवारी दिव्यंगाचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले
   प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जेकब पिल्ले यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये दिव्यंगासाठी लसीकरनाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आणून दिले, त्यामुळे दिव्यंगाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, शिवाय कधी कधी लसीकरण केंद्रावरून लस न घेताच परत जावे लागते त्यामुळे दिव्यंगाना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो,याबाबत पिल्ले यांनी केंद्र व राज्य सरकारने दिव्यंगासाठी कोविड लसीकरण करणे बाबद काढलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याची मागणी केली असता,सीईओ यांनी कॅन्टोमेंट हॉस्पिटलमध्ये द शनिवारी दिव्यंगाचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले, तसेच यासाठी एक दिवस अगोदर अशा व्यक्तीची माहिती देण्यात यावे असे सांगितले, यावेळी दीपक नुनसे, चंद्रकांत वालझाडे,शेखर भोसले,जितू देवकर आधी उपस्थित होते

Share

Other News