ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यांसाठी नवे नियम..


  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 7/26/2020 1:11:02 PM

देशांत दिवसेंदिवस रस्ते अपघातात होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रस्ते सुरक्षा नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यांसाठी हे नियम बनवले असून याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासून केली जाणार आहे.
          'हे' असणार नियम :
▪️ दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी दोन्ही बाजूनी हॅन्ड होल्डर आवश्यक असून दोन्ही बाजुंना फुटरेस्ट असणेही गरजेचे आहे.
▪️ दुचाकीच्या मागील चाकात मागे बसलेल्या व्यक्तीच्या कपड्यांचा (ओढणी, साडी) भाग गुंडाळला जाऊ नये म्हणून चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा.
▪️ दुचाकीवर लांबी 550 MM, रुंदी 510 MM, उंची 500 MM पेक्षा जास्त नसलेला कंटेनरही बसवता येणार असून अशावेळी दुसऱ्या व्यक्तीला मागे बसता येणार नाही. दरम्यान, 1 जानेवारी 2022 पासून बनवण्यात येणाऱ्या दुचाकींमध्ये AIS 146:2018 नुसार बदल केलेले असणार आहेत.

Share

Other News