ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन म्हणजे गरजू रुग्णांसाठी जीवदान - आ.डॉ.देवराव होळी


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/28/2020 10:44:45 PM

चामोर्शी / विक्रमपुर :- 

                   चामोर्शी तालुक्यातील विक्रमपुर ग्रामपंचायत अंतर्गत  येथे आयोजित दुर्गोत्सव निमित्याने गावातील युवक व नागरिकांच्या सहकार्याने दुर्गा उत्सव समिती चे वतीने भव्य रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते करून रक्त दात्याना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित रक्तदाते व नागरिकांना आमदार डॉ देवराव होळी व सरपंच प्रतिमा सरकार यांनी मार्गदर्शन केले ,या रक्तदान शिबिरात प्रामुख्याने पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलिस विभागाने आपल्या पोलीस कर्मचारी यांच्या वतीने व स्वतः पोलीस निरीक्षक यांनी रक्तदान केला. उपस्थित नागरिकांना  डाॅ. होळी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन म्हणजे गरजू रुग्णांसाठी जीवदान व स्थानिक आयोजक दुर्गा उत्सव समिती यांचे या आयोजन निमित्याने कौतुक केले यावेळी स्थानीय सरपंच प्रतिमा सरकार भाजपा तालुका सचिव साईनाथ बुरांडे, संजय विश्वास, कृष्णपद साना, वैद्यकीय अधिकारी डॉ.बिधान देवरी , संतोष स्वर्णकार तथा अन्य गणमान्य नागरिक  उपस्थित होते.
निखील राखडे (गडचिरोली जिल्हा मुख्य प्रतिनिधी)
7774807014

Share

Other News